कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा हुमगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली


कर्जत लोकनिर्माण प्रतिनिधी 



रायगड जिल्हा परिषद शाळा हुमगाव  ता.कर्जत जि. रायगड  येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पाळणा बांधून साजरी केली.रायगड जिल्हा परिषद शाळा हुमगाव येथील शिक्षिका सौ संगीता गणेश नकाते तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेत छोटाला पाळणा बांधून 'झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा' गायन छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली. 



आजच्या आधुनिक युगात पूर्ववत चालत आलेल्या पारंपरिक रूढी आणि परंपरा यांचा ऱ्हास होताना आपल्याला दिसत आहे. शाळेमध्ये देशाचे सुजाण भविष्य घडते. आजचा विद्यार्थी भविष्यात देशाचा सुजाण नागरिक घडावा यासाठी विद्यार्थ्यांवर वेगवेगळ्या पद्धतीने संस्कार करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शाळेमध्ये वेगवेगळ्या पारंपरिक कार्यक्रमाचे आयोजन करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये भविष्याचा वेध घेऊन जनतेच्या कल्याणासाठी स्वराज्य स्थापन केले आणि इतिहास घडविला. आजच्या आधुनिक युगामध्ये विद्यार्थ्यांच्या मनात भारतीय संस्कृती बद्दल आदर कायम राहण्यासाठी शाळा स्तरावर असे वेगवेगळे उपक्रम घेणे काळाची गरज आहे. या दृष्टिकोनातून रायगड जिल्हा परिषद शाळा हुंमगाव तालुका कर्जत जिल्हा रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पारंपरिक पद्धतीने पाळणा बांधून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.

Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
श्रीमती गीता चंद्रकांत रिकामे यांचे निधन
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
चिपळूण नगर परिषदे हद्दीतील विविध योजना अंतर्गत प्रास्तावित विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोक अर्पण समारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न
Image