रात्री साडेअकरा वाजता संगमेश्वर हुन चिपळूणला आले होते शायनींग मारण्यासाठी
चिपळूणच्या स्थानिक ग्रामस्थांनी वेळीच हस्तक्षेप केला नसता तर प्रकरणाला वेगळेच वळण लागले असते
चिपळूण/ लोकनिर्माण प्रतिनिधी
संगमेश्वरचे जेष्ठ पत्रकार आणि लोकनिर्माण वृत्तपत्राचे संगमेश्वर तालुका प्रतिनिधी सत्यवान विचारे यांनी शनिवार दिनांक २५ रोजी एका गृपवर अंत्रवली ते फणसवणे दुध डेरी या अंतरामध्ये सातवीतील एक अल्पवयीन मुलगा चार चाकी गाडी भरधाव वेगाने चालवत असतो, त्याच्या घरातील पालकांना अनेक वेळा कल्पना देऊनही पालक लक्ष देत नाहीत. हा प्रकार वेळीच थांबला नाही तर एखादा गंभीर अपघात घडू शकतो याची पालकांना कल्पना असुन देखील पालक जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. हा प्रकार थांबला नाहीतर पालकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे अशी पोस्ट केली होती. वास्तविक या मधे कोणाचेही नाव वा गाडी नंबर आदींचा उल्लेख केला नव्हता. मात्र "खाते त्याला खवखवते" या म्हणी नुसार अंत्रवली गावचे ग्रामस्थ सुधीर उर्फ बाबु सुर्वे यांनी विचारे यांना कॉल करुन अणेक जन गाडी चालवण्याचा परवाना नसताना गाडी चालवतात, मात्र माझा मुलगा गाडी चालवतो त्यालाच तुम्ही का रोखता असा प्रश्न विचारून आमच्याकडे माणूस नसल्याने तो पीकप मधुन दुध घेऊन डेरीवर जातो असे सांगून मोबाईल वरुन उलट सुलट वार्ता केली.
रात्री दहा वाजता अंत्रवली गावचे मंगेश सुर्वे यांनी कॉल करुन दमदाटी करण्यास सुरवात केली. त्यावेळी मी आता चिपळूणला आहे, उद्या आल्यावर आपण सविस्तर बोलू असे सांगितले असता अश्लील शिवीगाळ करुन आम्ही आता चिपळूणला येत आहोत असे संगितले.
रात्री साडे अकराच्या सुमारास स्वतः सुधीर उर्फ बाबु सुर्वे, मंगेश सुर्वे, देवरुख डेपोचे एस टी चालक सुनील उर्फ पांड्या सुर्वे, (सर्व राहणार अंत्रवली, ता. संगमेश्वर ) त्यांच्या बरोबर अजिंक्य विचारे (रा. पोयनार ता. खेड) हे पत्रकार विचारे यांच्या चिपळूण येथील मुलाच्या घरी येऊन तुम्ही पोस्ट का केलीत असे विचारून मोठ मोठ्याने दमदाटी करण्यास सुरवात केली. त्यावेळी घरातील महिलांनी तुम्ही आवाज कमी करा लोक झोपले आहेत असे सांगताच त्या चौघांनी अधिकच गोंधळ घालण्यास सुरवात केली. त्यावेळी विचारे यांच्या दोन्ही मुलांनी त्यांना समजवण्याचा खुप प्रयत्न केला पण ते कोणाचेच ऐकत नव्हते,. त्यांचा आवाज अधिकच वाढत गेल्याने काहीतरी घडले आहे या समजुतीने समोर राहणारे गावातील गावकरी धावत आले. त्यांनी त्या चौकडीस चांगलेच फैलावर घेऊन आता इथून निमूटपणे निघा नाहीतर आम्हास पोलिसांना बोलवावे लागेल असे सांगितले, तर काहींनी त्यांच्याच भाषेत समजावल्याने आता आपले काही चालणार नाही असे समजल्याने शेवटी तु गावी ये मग पाहतो अशी धमकी देऊन निघून गेले.
वास्तविक सुधीर उर्फ बाबु सुर्वे याचा सातवीत असणारा मुलगा गेली सहा महिने बोलोरो पिकअप गाडी अंत्रवली फणसवणे रोडवर चालवत आहे. याची कल्पना पालकांना देऊनही कोणीच लक्ष देत नसल्याने शेवटी पालकांनी आता तरी बोध घ्यावा म्हणुन मोगम पोस्ट पत्रकार विचारे यांनी केली होती, मात्र त्या पालकांनी त्याचा उलट अर्थ काढून पत्रकारालाच धमाकावन्याचा गैरप्रकार केला आहे.
कदाचित वेळीच जर तेथील स्थानिक ग्रामस्थ धावून आले नसते तर कदाचित अनुचित प्रकार घडला असता, किंवा जर ग्रामस्थानी पोलिसांना बोलावले असते तर आज सर्व गाडी सकट पोलिस कस्टडीत असते, मात्र विचारे यांनी एवढे होऊनही समंजस भूमिका घेतल्याने त्यासर्वlना घरी जाता आले असल्याचे ग्रामस्थात चर्चिले जात आहे.
सुर्वे कंपनी आतातरी बोध घेतील अशी अपेक्षा विचारे यांनी व्यक्त केली आहे. तर असल्या धमक्याना आपण भीक घालत नसल्याचे सत्यवान विचारे यांनी सांगितले आहे. एवढेच नव्हे तर त्या मुलाने गाडी चालवणे बंद न केल्यास त्याची तक्रार परिवहन विभागाकडे करणार असल्याचे पत्रकार विचारे यांनी सांगितले आहे.