जनतेच्या प्रश्नांबाबत नेहमीच जागल्याची भूमिका बजावणा-या पत्रकारांना एसटी महामंडळाने दाखवली जागा !

 

मुंबई लोकनिर्माण प्रतिनिधी जनतेच्या प्रश्नांबाबत नेहमीच जागल्याची भूमिका बजावणाऱया पत्रकारांना एसटी महामंडळाने 'जागा' दाखवली आहे. एसटी बसमध्ये स्वातंत्र्य सैनिक, आमदारांप्रमाणेच पत्रकारांसाठी एक सीट राखीव ठेकली जाते.ती आतापर्यंत आमदाराच्या राखीव सीटच्या मागील सीटवर असायची. मात्र आता महामंडळाने सुमारे २७०९ नव्या गाड्य़ांच्या बांधणीचे काम हाती घेतले असून त्यामध्ये पत्रकारांसाठीची सीट शेवटून दुस-या रांगेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एसटीच्या लेखी पत्रकार बॅकबेंचर असल्याचेच अधोरेखित होत आहे.आतापर्यंत एसटीमध्ये पत्रकारांसाठी राखीव सीट चौथ्या-पाचव्या रांगेत ठेकली जात होती. मात्र महामंडळाने नव्या ४२ सीटच्या गाड्य़ांमध्ये पत्रकारांनी गाडीतील शेवटून दुसऱ-या रांगेत म्हणजे ३० नंबरची सीट राखीव ठेवली आहे. यावरून एसटी महामंडळाचा पत्रकारांप्रति असलेला दृष्टिकोन दिसून येत आहे.

    एसटीने पत्रकारांबरोबरच आपल्या कर्मचाऱ्यांसाठी असलेली राखीव सीटही मागे टाकली आहे. कर्मचाऱयांची सीट आतापर्यंत गाडीच्या मध्यभागी ठेवली जात होती. ती आता शेवटच्या रांगेत ठेवली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यामध्ये नाराजी आहे. ज्या एसटीसाठी दिवसरात्र काम करतो, त्या गाडीमध्येही सन्मान मिळत नसल्याची खंत एका कर्मचा-याने व्यक्त केली!