इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट पाटणच्या १२ विद्यार्थ्यांची इंडस्ट्रियल ट्रेनिंग साठी निवड

 

पाटण लोकनिर्माण प्रतिनिधी 


  कोर्टयार्ड मेरीट “ येथे झालेला कॅम्पस मुलाखतीत येथील कोयना एज्युकेशन सोसायटी संचलित इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट पाटण.  च्या १२ विधार्थी याची इंडस्ट्रियल ट्रेनिंग साठी निवड करण्यात आली इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेन्ट ची स्थापना २०२२ साली झाली असून कॉलेजचे हे प्रथमच वर्ष असून अल्पावधीतच हे उत्तुंग यश संपादन केले



  इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मध्ये १० वी १२ वी तसेच पदवी नंतर डिप्लोमा,  सर्टिफिकेट कोर्सेसचे प्रशिक्षण दिले जाते. कोर्स पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग व जॉब प्लेसमेंट हे कॉलेज मार्फतच दिले जातेण. देशात व परदेशात ट्रेनिंग व जॉब प्लेसमेंट उपलब्ध करून देण्याची सुवर्ण संधी कॉलेज मार्फत करून देण्यात येते. इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट हे सातारा जिल्ह्यातील पहिले आय एस ओ  [ ९००१ : २००५ ] मानांकित कॉलेज आहे  सुसज्य क्लास रूम्,  डिजिटल मल्टिमिडीया रूम, ट्रेनिंग किचन,  रेस्टॉरंट, बँक्वेट हॉल,  फ्रंट ऑफिस , हाऊसकीपींग रूम,ऑडिटोरिअम हॉल एलायब्ररी, कॉम्पुटर लॅब, मुले व मुली साठी स्वतंत्र हॉस्टेल , उच्च अनुभवी शिक्षक वर्ग अशा सर्व सोयीनी परिपूर्ण सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची व पालकांची अल्पावधीत पसंतीस आलेले  यशस्वी विधार्थीना अमोल चव्हाण,  समीर सपकाळ,  भरत कांबळे आणि शिक्षकेतर वर्ग यांचे   विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

   या यशा बद्दल माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर , संस्था अध्यक्ष डॉ सोपानराव चव्हाण, जनरल सेक्रेटरी, अमरसिंह पाटणकर, याज्ञसेन पाटणकर व संजीव चव्हाण, हॉटेल मॅनेजमेंटचे प्राचार्य चेतन सावंत यांनी त्याचे अभिनदन केले.