अवघ्या २० मिनिटांच्या अंतराने पती-पत्नीचा मृत्यू, मधुमेहावरील आयुर्वेदिक औषध घेतल्यानंतर काही वेळातच दोघांचा मृत्यू झाल्याचा संशय

 

निपाणी लोकनिर्माण टीम 



अवघ्या २० मिनिटांच्या अंतराने पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी वडणगे (ता. करवीर) येथे घडली. मधुकर दिनकर कदम (वय ५९) आणि जयश्री मधुकर कदम (वय ४९, दोघे रा. दिंडे कॉलनी, वडणगे) असे या दाम्पत्याचे नाव आहे.

मधुमेहावरील आयुर्वेदिक औषध घेतल्यानंतर काही वेळातच दोघांचा मृत्यू झाल्याचा संशय या दाम्पत्याच्या मुलींनी वर्तवला आहे. दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी दोघांचा व्हिसेरा राखीव ठेवल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.

सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झालेले मधुकर कदम हे पत्नी आणि दोन मुलींसह वर्षभरापूर्वीच वडणगे येथील नवीन घरात राहायला गेले होते. या दाम्पत्यांना मधुमेहाचा त्रास असल्याने, १५ दिवसांपूर्वीच मुक्त सैनिक वसाहत परिसरातील एका डॉक्टरकडून त्यांनी आयुर्वेदिक औषधे घेतली होती. आज सकाळी साडेसातच्या सुमारास दोघांनीही औषधी पावडर पाण्यात मिसळून प्राशन केली.

त्यानंतर मधुकर कदम हे दूध आणण्यासाठी बाहेर गेले, तर स्वयंपाक करताना काही वेळातच अस्वस्थ होऊन जयश्रींना श्वासोच्छवासास त्रास झाल्याने त्या बेशुद्ध पडल्या, तर यावेळी मधुकर कदम हे दूध डेअरीजवळच्या चौकात चक्कर येऊन पडले. नागरिकांनी तातडीने कदम दाम्पत्यास खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून सीपीआरमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून दोघांचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. पती-पत्नीच्या अशा संशयास्पद मृत्यूमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 


Popular posts
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
महाराष्ट्र ज्ञान महामंडळतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करून कोर्सचे अपग्रेडेशन — डिजिटल व AI Divide दूर करण्याचा निर्धार
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image
रत्नागिरीत राष्ट्र सेवादल व्यक्तिमत्व विकास शिबीर
Image
देवरुखात जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तिक होणार साजरा! आणि लोकनिर्माण चे डिजिटल माध्यमात होणार पदार्पण
Image