राजापूर तालुक्यातील डोंगर येथील साखरकर बेकरीला उद्योजकता पुरस्कार जाहीर


राजापूर लोकनिर्माण टीम 

   फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या उद्योजकता पुरस्कारासाठी  यावर्षीं तालुक्यातील डोंगर येथील साखरकर बेकरी या उद्योगाची निवड करण्यात आली आहे.

रविवार ११ जून रोजी रत्नागिरी जिल्हा उद्योग विकास परिषदेच्या कार्यक्रमात सायंकाळी ४ वाजता श्रद्धा साफल्य मंगल कार्यालय, एमआयडीसी, रत्नागिरी येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळयात उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांच्या हस्ते हा पुरस्कार  प्रदान करण्यात येणार आहे.

यावेळी माजी केंद्रीय रेल्वे आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू, पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री चे अध्यक्ष ललित गांधी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. साखरकर उद्योग समुहाची उदयोजकता पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल साखरकर बेकरी व्यवस्थापनाचे  अभिनंदन होत आहे.