चिपळूण लोकनिर्माण टीम
चिपळूण तालुक्यातील रिक्टोली इंदापूर मधील निर्मला शिंदे या वृद्ध महिलेचे दागिने लुटून खून करून पसार झालेल्या आरोपीला चिपळूण पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे.गुन्हा घडल्याचा आठवड्याच्या आतच खुनातील आरोपीला मोठ्या शिताफीने पकडल्या मुळे चिपळूण,अलोरे - शिरगाव पोलिसांचे कौतुक होत आहे. बुधवारी आरोपी प्रशांत शिंदे यांना न्यायालयासमोर हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की या खुनाच्या संशयावरून अटक करण्यात आलेला आरोपी प्रशांत प्रकाश शिंदे वय ३० रा.रिक्टोली ता.चिपळूण याने
बुधवार दि. १९ एप्रिल रोजी रात्री ८.३० वा ते दि.२० एप्रिल रोजी स.९.३० च्या दरम्यान मयत निर्मला सदाशिव शिंदे वय ७५ यांच्या घरात चोरीच्या उद्देशाने प्रवेश करून मयत व्यक्तीच्या कानातील कुडी चोरून फरार झाला होता. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी चिपळूण, अलोर- शिरगाव पोलिसांनी कंबर कसली फरार आरोपी प्रशांत शिंदे हा रिक्टोली येथील धनगरवाडी नाजिक जंगलात लपून बसला होता. अखेर सापळा रचून पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिराने त्याला अटक केली. चिपळूण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, शिरगावचे पोलीस निरीक्षक रत्नदीप साळोखे ,खेड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक एपीआय सुजित गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय प्रकाश शिंदे,एएसआय दिलीप पवार ,एएसआय प्रकाश धामापूरकर,पो.ह गणेश नाळे,पो.ह वृषभ शेटकर,पो. अतुल ठाकुर,पो.ह राकेश जाधव,पो. ह गणेश शिंदे,पो.ह केशव मुठगर यांनी आरोपी अटक करणे कामी विशेष मेहनत घेतली या धडाकेबाज कामगिरी बद्दल चिपळूण,आलोरे - शिरगाव पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.चिपळूण तालुक्यातील रिक्टोली इंदापूरमधील निर्मला सदाशिव
शिंदे या ७५ वर्षीय आजीचा खून करून तिच्या कानातील कुडी चोरून आरोपी अद्याप फरार झाला होता. या प्रकरणी चिपळूण आणि शिरगाव पोलीस अधिक तपास करीत होते. ही घटना दि. १९ एप्रिल रोजी रात्री ८.३० वा. ते दि. २० एप्रिल रोजी सकाळी ९.३० वा. या कालावधीत घडली.
यातील मयत श्रीमती निर्मला सदाशिव शिंदे (७५ वर्षे रा रिक्टोली ता.चिपळूण) ही एकटीच आपल्या घरात होती. दि. १९ एप्रिल रोजी रात्री ८.३० वा. ते दि. २० एप्रिल रोजी सकाळी ९.३० वा. च्या मुदतीत दोन्ही दरवाजे आतून बंद करुन एकटीच झोपलेली असताना कोणीतरी अज्ञात इसमाने यातील मय निर्मला सदाशिव शिंदे हिचे घराचा मागील सिमेंटचा दरवाजा तोडून त्याद्वारे घरात प्रवेश करुन घराचे मजघरात झोपलेल्या मयत हिचे नाक, तोंड उशीने दाबून तिला ठार मारुन तिचे दोन्ही कानातील सोन्याच्या कुड्या काढून चोरी केल्याचा गुन्हा अलोरे -शिरगाव पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्यानंतर तेथून संशयीत आरोपी फरार झाला सुरुवातीला आजीचा आकस्मिक मृत्यू
म्हणून शिरगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. मात्र शविच्छेदनानंतर तिचा खून झाल्याचे उघडकीस आले. त्यानुसार शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रत्नदीप साळोखें यांनी तपासाची गती वाढवली आणि दसपटी दरम्यान तपास करीत असताना संशयित आरोपी याने पोलीस गाडी पाहून दुचाकी वेगाने चालवू लागला. नंतर आपली दुचाकी व बॅग रस्त्यात टाकून जंगलात पळून
गेला.असल्याची माहिती उपलब्ध झाली होती. पोलिसांनी त्याची दुचाकी आणि बॅग ताब्यात घेतली होती. काही दिवसापूर्वी याच संशयित आरोपीने ११२ या पोलीस नंबर ला कॉल करून तिवरेमध्ये एकाने आत्महत्या केली असल्याची खोटी. माहिती दिली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चांगलाच चोप दिला होता. गेल्या सोमवार पासून तो घरातून बेपत्ता असल्याची माहिती नातेवाईक देत आहेत, तर शिरगावपोलिसांच्याकडूनसंशयिताच्या कुटुंबियांची कसून चौकशी सुरू होती. पुढे पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला अखेर खरा गुन्हेगार प्रशांत शिंदे चिपळूण ,अलोर शिरगाव पोलिसांच्या तावडीत मिळाला.