चिपळूण/लोकनिर्माण( जमालुद्दीन बंदरकर )
तालुक्यातील धामेली गावातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य रस्त्यावरील ग्रामपंचायतीच्या उतारावर आणि गणपती विसर्जनाच्या नाल्याच्या ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूच्या जागेवर भगदाड पडले असून दोन्ही बाजूंच्या उतारावरून येणाऱ्या गाड्यांची वर्दळ असते. एकाच वेळी भरधाव वेगाने येणा-या गाड्या आल्यास भगदाड असलेल्या ठिकाणी गाडीचा टायर जावून अपघात होऊ शकतो. यासाठी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देवून असलेला भगदाड बंद करून होणारी दुर्घटना टाळण्याचा प्रयत्न करावा अशी तेथील ग्रामस्थ आणि वाहतूक करणाऱ्या वाहकांची मागणी आहे.