जागतिक महिला आणि कामगार दिन देवरूख येथे होणार साजरा - हिरकणी आणि लोक निर्माण २०२३ सन्मानाचे मान्यवरांच्या हस्ते वितरण !

 

संगमेश्वर/लोकनिर्माण ( धनंजय भांगे)


लोकनिर्माण वृत्तपत्राच्या माध्यमातून गेली आठ वर्षे जागतिक महिला आणि कामगार दिन देवरूख मध्ये साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमात कर्तृत्ववान महिलांना हिरकणी आणि कामगार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कामगारांना गुणवंत कामगार या राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी संयुक्तपणे कामगार आणि महिला दिन साजरा करण्यात येणार असून कर्तृत्ववान महिला आणि गुणवंत कामगारांना संगमेश्वर तालुक्याचे तहसीलदार श्री. सुहास थोरात, गटविकास अधिकारी श्री. भरत चौगुले, देवरूख आणि लोकनिर्माण वृत्तपत्राचे संपादक श्री. बाळकृष्ण कासार यांच्या उपस्थितीत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात करण्यात येणार आहे.