कल्याण/लोक निर्माण (सौ.राजश्री फुलपगार)
जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. वंडारशेठ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कल्याण डोंबिवली जिल्ह्याच्या वतीने गुरूवार दि. २७ एप्रिल २०२३ रोजी सायं. ५ . ०० वाजता जिल्हा मध्यवर्ती कार्यालय शिवाजी चौक, कल्याण (प) येथे पक्षातील पदाधिकारी , कार्यकर्त्यांची विशेष बैठक सन्मा. प्रदेश पदाधिकारी रमेशजी हनुमंते- सरचिटणीस, महेशजी तपासे- मुख्य प्रवक्ते, मायाताई कटारिया- सचिव, प्रकाशजी तरे- सचिव व सुधीरशेठ पाटील-, जिल्हाध्यक्ष सारिका ताई गायकवाड, ठाणे जिल्हाध्यक्ष युवक तसेच प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या साक्षीने संपन्न झाली.
महाविकास आघाडीने मुंबई येथे दि. ०१ मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिनी 'संविधानाच्या रक्षणासाठी' एकतेची "वज्रमूठ"* या सभेचे आयोजन केले आहे. त्या अनुषंगाने या सभेसाठी कल्याण डोंबिवली जिल्ह्यातून पक्षाचे जवळजवळ २००० ते २५०० कार्यकर्ते "वज्रमुठ" सभेस सहभागी होणार आहे. असे नियोजन या विशेष बैठकीत करण्यात आले. बैठकीला जिल्हा पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, कल्याण (प), कल्याण (पूर्व), डोंबिवली विधानसभा अध्यक्ष, सेवादल, महिला, युवक, विध्यार्थी, शिक्षक, डॉक्टर, वकील, सामाजिक न्याय, अल्पसंख्याक, कला- सांस्कृतिक व इतर सेलचे जिल्हाध्यक्ष आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. बैठक उपस्थितांचे आभार मानून राष्ट्रगीताने बैठकीचे संपन्न करण्यात आली.