मा. माहिती आणि जनसंपर्क संचालक देवेंद्र भुजबळ यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

मुंबई लोकनिर्माण टीम 



वृतपत्रकारिता, दूरदर्शन, आकाशवाणी, शासकीय जनसंपर्क आणि आता डिजिटल माध्यमात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल श्री देवेंद्र भुजबळ यांना पत्रकारांची राष्ट्रीय संघटना असलेल्या एजेएफसी या संघटनेकडून जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम उद्या बुधवार, दिनांक ३ मे २०२३ रोजी सायं. ४ वाजता, गांधी बुक सेंटर,  ग्रँट रोड, नाना चौक, मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे.

     या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन एजेएफसीचे संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल, केंद्रीय अध्यक्ष कोळी यांनी केले आहे. 

    

संघटनेने जाहीर केलेले अन्य पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत.

१)आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मृती दर्पण पुरस्कार - 

श्री. निलेश पोटे, वृत्तसंपादक दै. अजिंक्य भारत 

२) नानासाहेब जोशी स्मृती संपादक सन्मान पुरस्कार  श्री. बाळकृष्ण कासार, संपादक लोकनिर्माण 

३) जेष्ठ पत्रकार नवीन सोष्टे मराठी पत्रकार सन्मान पुरस्कार - श्री. विठ्ठल मोघे, दै. पुण्यनगरी दौंड

४) जेष्ठ पत्रकार जयानंद मठकर स्मृती आदर्श पत्रकार पुरस्कार - श्री. निसार अली

५) मधुकर लोंढे स्मृती साप्ताहिक संपादक पुरस्कार - श्री. किरण बाथम

६) हभप शरददादा बोरकर स्मृती सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार - प्रा. श्री. एल. बी. पाटील (रायगड भूषण)


        ********