चिपळुणात आज शब्दसुगंध चे प्रकाशन

 

चिपळूण लोकनिर्माण प्रतिनिधी 

चिपलूण  येथील तुकाराम गणपत जाधव यांच्या लेखणीतून साकारलेल्या  'शब्दसुगंध ' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सोमवार दि 29 मे रोजी होणार आहे. शहरातील माधव सभागृहात सायंकाळी 4 ते 7 या वेळेत हा कार्यक्रम होईल. 

देवरूख महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व साहित्यिक डॉ . सुरेश जोशी यांच्या हस्ते हा पुस्तक प्रकाशन सोहळा होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चिपळूण - संगमेश्वरचे आमदार शेखर निकम,ज्येष्ठ साहित्यिक अरुण इंगवले, रिगल एज्यू . सोसायटीचे अध्यक्ष संजय शिर्के  व मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन शेखर जाधव यांनी केले आहे.