जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्था निवडणूकी साठी परिवर्तन पॅनल सज्ज

 

रत्नागिरी लोकनिर्माण प्रतिनिधी 



जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्था रत्नागिरी ची पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून मागील निवडणुकी प्रमाणेच परिवर्तन पॅनल विरुद्ध सहकार पॅनल अशीच लढत होणार असून परिवर्तन पॅनल ने जोर धरला आहे. गेल्या वेळी १६ पैकी १० जागा निवडून आणून ५० वर्षा नंतर  आपले अस्तित्व निर्माण केले होते आणि सहकारची  असलेली एकहाती पक्कड सैल केली होती मागील पाच वर्षात अनेक चांगले निर्णय घेऊन परिवर्तन चा ठसा मजबूत केला आहे. त्या मुळे परिवर्तन चे पारडे जड असल्याचे जिल्ह्यातून बोलले जात आहे. परिवर्तन पॅनल च्या  वतीने प्रचाराचा शुभारंभ काही दिवसा पूर्वी चिपळूण तालुक्यातून करण्यात आला होता. सुकाई देवीच्या प्रांगनातून प्रचाराचा नारळ फोडण्यात आला असून  प्रचाराचे बिगुल वाजले आहे. या निवडणुकीत सर्व ठिकाणी उमेदवार उभे असून प्रचाराला सुद्धा जोरात सरवाट  करण्यात आला आहे.