रिफायनरीला विरोध करण्यासाठी बारसूकरानी सड्यावर सरकारच्या नावे श्राद्ध घालून केले मुंडण आंदोलन

 

राजापूर/ लोकनिर्माण (सुनील जठार)                          

 रिफायनरी बाबत आता बारसूकर अधिक आक्रमक झाले आहेत. बारसू करानी सरकारचे श्राद्ध घालून आज मुंडण आंदोलन केले. सरकार स्थानिकांवर दडपशाही करीत असल्याचा बारसूकरांचा आरोप आहे. रिफायनरी प्रकल्पाला बारसूकरांचा विरोध असून त्यांनी याआधीही या प्रकल्पाविरोधात आंदोलन केले होते. त्यामुळे बारसू कर पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरात शांत असलेले हे प्रकल्पविरोधी आंदोलन पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



राजापूर तालुक्यातील नाणार रिफायनरी प्रकल्प प्रचंड विरोधामुळे रद्द झाल्यानंतर हा प्रकल्प जवळच असलेल्या बारसू परिसरात उभारण्याचा सरकारचा मानस आहे. त्यासाठी शासनाने अलीकडेच या परिसरात मोठ्या पोलीस बंदोबस्तात माती परिक्षणासाठी ८२ ठिकाणी बोअर मारल्या आहेत.  त्यावेळी स्थानिकांनी याविरोधात जोरदार आंदोलन केले होते.आज बारसूकरानी त्याच ठिकाणी एकत्र येत या प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी बारसूच्या सड्यावर सरकारचे श्राद्ध घालत मुंडण आंदोलन केल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

आंदोलकांनी त्या ठीकणी सरकारचे श्राद्ध घालताना जोरजोरात घोषणाबाजी केली. आक्रोश केला.  कोणत्याही स्थितीत प्रकल्प होऊ द्यायचा नाही, असा चंग विरोधकांनी बांधला आहे. या आंदोलनात परिसरातील आठ गावातील आंदोलक त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे शासन आणि प्रशासन आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे!


Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
श्रीमती गीता चंद्रकांत रिकामे यांचे निधन
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
चिपळूण नगर परिषदे हद्दीतील विविध योजना अंतर्गत प्रास्तावित विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोक अर्पण समारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न
Image