पाटण लोक निर्माण प्रतिनिधी (विनोद शिरसाट)
मुले संस्कारित करुन प्रपंच करणे हे आजच्या पिढिला आदर्शवत ठरणारे काम सुभद्रा मातेकडुन झाल्याने तिला मोक्ष प्राप्ती झाली असे मत युवा किर्तनकार सचिनजी महाराज यानी मांडले.
झाकडे (ता. पाटण) येथील कै.सुभद्रा सांळुखे यांच्या सपेंडी उत्तरकार्य विधीनिमित्त भव्य किर्तन महोत्सवचे आयोजन करणेत आले होते त्यावेळी युवाकिर्तनकार हभप. सचिनजी महाराज (तामकणे) बोलत होते यावेळी पाटण तालुका वारकरी संघाचे अध्यक्ष हभप विलास माने ,उपाध्यक्ष गायनाचार्य किरनजी लोहार तथा वारकरी संघाचे मोरगिरी विभागातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सचिन महाराज म्हणाले दोन मुले आणी आठ मुली २१ नातंवंडे आणी १४ परतुंड असा मोठ्या परिवाराचा गाढा ओढणारी ही माउली सांळुखे कुटुंबाची आधारवर होती आज सगळी मुल मुली सुसंस्कृत करुन हे कुटुंब निश्चित घ्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी या मातेचे कष्ठ त्याग आणी निष्ठा फळाला आली आणी या मातेला मोक्ष प्राप्ती झाली.राजामाता जिजाऊंचे संस्कार कामी आल्यामुळे छत्रपती शिवराय जन्माला आले आणी आपल्या सातपिढ्यांचा उद्धार झाला म्हणुन आज आपण हे सोहळे साजरु शकत आहे.यासाठी आजच्यामोबाइल संस्कृती मध्ये अडकलेल्या मुलाना अध्यात्म शिक्षण ही काळाची गरज झाली आहे आजची पिढी परकिय आक्रमणापासुन वाचवायची असेल तर मुलाना संस्कारित करा अन्यथा पाश्चिमात्य संस्कृती मुळे नातीगोती नामशेष होणार म्हणून गावोगावी अध्यात्मिक सोहळे साजरे करण्यासाठी तरुणानी पुढाकार घ्यावा असे मत शेवटी सचिनमहाराज यानी मांडले
यावेळी संत शिरोमणी तुकोबांराय वारकरी शिक्षण संस्थेचे बालगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.साळुंखे परिवारातिल मधुकर साळुंखे,धनाजी साळुंखे आणी झाकडे गावासह मोरगिरी पंचक्रोशीतील असंख्य वारकरी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.