रविवारी ना. अजित पवार यांचा पाटण तालुक्यात दौरा गुढे ( तळमावले ) येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा


पाटण/लोकनिर्माण  ( विनोद शिरसाट )

 रविवार दि. २८ मे रोजी पाटण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा गुढे (तळमावले) येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे . या मेळाव्यास राज्य विधानसभा विरोधी पक्षनेते व राज्याचे माजी उप मुख्यमंत्री ना . अजितदादा पवार , विधानपरिषद माजी सभापती आ . रामराजे नाईक-निंबाळकर , खासदार श्रीनिवास पाटील , माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर , माजी पालकमंत्री आ. बाळासाहेब पाटील , माजी मंत्री आ. शशिकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याची माहिती पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.     



          या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की या मेळाव्याला आ.मकरंद पाटील, आ. दिपक चव्हाण , सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, दिपक पवार, माजी आमदार प्रभाकर देशमुख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर , राष्ट्रवादी काँग्रेस माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अध्यक्ष सारंग पाटील, राजेश पाटील आदी मान्यवरही उपस्थित राहणार आहेत . यावेळी मान्यवरांच्या हस्ते कुंभारगाव - ढेबेवाडी विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाचे उद्घाटन समारंभ आयोजित केला आहे . 

     या मेळाव्यास पाटण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष , सर्व सेलचे प्रमुख पदाधिकारी , सर्व आजी ,माजी जि.प. व पं.स. सदस्य , नगराध्यक्ष, नगरसेवक , सरपंच , उप सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व संस्थाचे चेअरमन , व्हा. चेअरमन , संचालक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही शेवटी राजाभाऊ शेलार यांनी या पत्रकाद्वारे केले आहे.

Popular posts
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
Image
पहलगम घटनेच्या निषेधार्थ यवतमध्ये सर्व धर्मीय कँडल मार्च काढून तीव्र निषेध
Image
महाराष्ट्र ज्ञान महामंडळतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करून कोर्सचे अपग्रेडेशन — डिजिटल व AI Divide दूर करण्याचा निर्धार
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image