प्रा. श्रीनिवास पवार यांना शिवाजी विद्यापीठाची पी एच.डी. पदवी प्रदान

 पाटण लोकनिर्माण( श्रीगणेश गायकवाड )

पाटण प्रतिनिधी: बाळासाहेब देसाई कॉलेज मधील इंग्रजी विभागात विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेले प्रा. श्रीनिवास श्रीहरी पवार यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून इंग्रजी या विषयामध्ये पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. वेणूताई चव्हाण कॉलेजचे इंग्रजी विभागप्रमुख प्रा.डॉ.राजेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ‘वॉल्टर मोस्ली या अमेरिकन कादंबरीकाराच्या रॉलीन्स मिस्टरी सेरिझ मधील वांशिक भेदभाव याचा अभ्यास’ या विषयावर त्यांनी प्रबंध सादर केला.



बाळासाहेब देसाई कॉलेज पाटणचे इंग्रजी विषयाचे प्रा. श्रीनिवास पवार यांना शिवाजी विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी जाहीर झाली आहे.  सदर प्रबंधासाठी त्यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या विभाग प्रमुख प्रो. डॉ. तृप्ती करकट्टी, बाळासाहेब देसाई कॉलेजचे माजी विभाग प्रमुख डॉ. एन. जी. वाले यांचे  सहकार्य व मार्गदर्शन लाभले.  

       प्रा. श्रीनिवास पवार हे  इंग्रजी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असून बाळासाहेब देसाई कॉलेज मधील कला मंडळ  या उपक्रमाचे समनवयक आहेत. देशभरात विविध ठिकाणी त्यांनी  ओरिटेशन कोर्स पूर्ण केले.तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर जवळपास १५ शोध निबंध त्यांचे प्रसिद्ध झाले आहेत. तसेच विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सेमिनार मध्ये त्यांनी कविता वाचन केले आहे. त्यांनी  शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागात  पेपर सेटर पासून मॉडरेटरपर्यंत विविध  कामे केली आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या युवा महोत्सवात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यासाठी इंग्रजी वक्तृत्व या स्पर्धासाठी परीक्षक म्हणून काम केले आहे.

         प्रा.श्रीनिवास पवार यांनी बी. ए ची पदवी औरंगाबाद विद्यापीठातून घेतली असून एम.ए. ची पदवी पुणे विद्यापीठातून घेतली आहे. त्यानंतर सेट ही परीक्षा उत्तीर्ण झाले असून त्यांना संगीत क्षेत्राची विशेष आवड आहे. प्रा. पवार हे संगीत विशारद परीक्षा उत्तीर्ण असून त्यांनी संगीत क्षेत्रातील मानाची अशी ‘संगीत अलंकार’ ही पदवी सुद्धा घेतली आहे. २०१२ मध्ये ते बाळासाहेब देसाई कॉलेज,पाटण याठिकाणी सेवेत कायम झाले.

        प्रा. श्रीनिवास पवार यांना पी.एच.डी. पदवी मिळाल्याबद्दल माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व राष्ट्रवादीचे नेते श्रीमंत सत्यजितसिंह पाटणकर, कोयना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण, उपाध्यक्ष प्रकाशभाऊ पाटील, जनरल सेक्रेटरी श्रीमंत अमरसिंह पाटणकर, संचालक संजीवदादा चव्हाण,श्रीमंत याज्ञसेन पाटणकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.डी. पवार, अधीक्षक विजय काटे,यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवकवर्ग यांनी अभिनंदन केले.