यू टाईप रस्ता रुंदीकरण प्रक्रियेबाबत पुनर्वसन कृती समिती कल्याण पूर्व, च्या शिष्टमंडळाने घेतली पालिका आयुक्तांची भेट


लोकनिर्माण कल्याण /सौ. राजश्री फुलपगार


समिती शिष्टमंडळाने मा.आयुक्त यांची पुनर्वसन, रस्ता रुंदीकरण याबाबत भेट घेतली. 

आयुक्तांकडे कल्याण पूर्वे चे मा.आमदार गणपत गायकवाड, मा.नगरसेवक निलेश शिंदे, विशाल पावशे ,प्रमोद पिंगळे तसेच पुनर्वसन समिती चे अध्यक्ष व मा.नगरसेवक उदय रसाळ हे उपस्थित होते .

पुनर्वसन कसे करणार त्या साठी काय उपाय योजना करणार, आहे त्याच ठिकाणी कसे पुनर्वसन करणार, जागा मालक भाडे करू, ताबा धारक अशा प्रकाराचे  लोक या रस्त्यात आहेत त्यांचे कसे पुनर्वसन करणार.? असे शिष्टमंडळा च्या माध्यामातून विजय मोरे, उदय रसाळ यांनी आयुक्तांना प्रश्न विचारले. 

आयुक्तांनी तसेच शहर अभियंता यांनी सविस्तर माहिती दिली, त्यांनी सांगितले आधी सर्वे करू द्या त्यानंतर सविस्तर अहवाल तयार होईल. 

यामधे क्लस्टर च्या माध्यामातून विकास साधण्यात येईल. तत्पूर्वी काही विकासक यांनी जर विकासाचा प्रस्ताव दिला तर बाधितांना तिथेच पुनर्वसन करण्यासाठी भाग पाडू, त्यांना fsi देवून असे सांगितले.तसेच पालिकेचे घरासाठी असलेल्या भूखंडावर बिल्डींग, मॉल उभारून पुनर्वसन करू, किंवा ज्या बिल्डरांकडून पालिकेला मालमत्ता हस्तांतरित झाल्या आहेत त्या सुद्धा पुनर्वसना करिता देता येतील असे सांगितले. 

लवकरच वैयक्तिक सर्व लोकांना नोटीस बजावण्यात येतील सर्वांच्या सुनावण्या घेण्यात येतील त्यानंतर प्रस्ताव शासनाकडे जाईल असे त्यांनी सांगितले .तोपर्यंत लगेच काही तोड फोड होणार नाही....

लेखी स्वरुपात माहिती किंवा पुनर्वसनाची योजना द्यावी अशी मागणी उदय रसाळ यांनी केली. त्यावर ते म्हणाले की आधी सर्वे पूर्ण होवू द्या असे म्हणालेत. 

समितीचे दुर्गेश फडोळ यांनी, असलेल्या  घरापेक्षा लहान घरे , दुरवस्था झालेल्या bsup घरा मध्ये जाण्यास आमचा विरोध राहील असे सांगितले. 

एकंदर पालिका आयुक्त , नगर रचना कार मॅडम यांचा सुर सर्वांनाच आहे तेथेच पुनर्वसन मिळेल असा होता 

आयुक्त म्हणाले या रस्ता लगत असलेल्या जागामालक यांची पण बैठक लावून त्यांच्या समजावून सांगू असे मत मांडले 

एकंदरीत पालिकेच्या भूमिकेवर थोडा विश्वास ठेवून पुनर्वसन कृती समितीच्या माध्यामातून, नियोजित मोर्चा तूर्तास स्थगित करण्यात येत आहे असे त्यांना सांगितले आहे. 

पालिकेच्या सुनावण्यात झाल्यावर ते काय निर्णय घेतात त्यावर पुढील पावले उचलण्यात येतील असे पुनर्वसन कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

पुनर्वसन कृती समितीच्या वतीने, विजय मोरे, दुर्गेश फडोळ, सुनील डुंबरे, फिरोज हे उपस्थित होते.