चिपळूण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राष्ट्रीय महामार्ग कार्यलयात धडक

 

चिपळूण प्रतिनिधी 

मुंबई -गोवा  महामार्गाची झालेली दुरावस्था, बहादुरशेख नका येथे होणारी वाहतूक कोंडी, रिक्षा स्टॅन्ड पार्किंग व वाशिष्टी नदीवरील नवीन पुलावरील पडलेले खड्डे अशा अनेक प्रश्नांसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालूका अध्यक्ष अभिनव जी भुरण व महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष राजू जी खेतले यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्या सोबत राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयात धडक दिली. त्यावेळी अभियंता श्री. खुणेकर रावसाहेब यांना ठेकेदाराच्या निष्काळजी पणाची व सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाची कडक शब्दात जाणीव करून संबंधित अधिकाऱ्यांनां घेऊन बहादूरशेख येथील वाहतूक कोंडी कमी करावी यासाठी विनाकारणं लावलेले बारिगेट्स ताबडतोब हटवून रस्ता मोकळा केला गेला व रिक्षा चालकांना देखील पार्किंग ची सोय करून देण्यात आली. वाशिषठी नदी पुलावरील खड्डे डांबरीकरण करून येत्या 3 दिवसात भरून देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. सर्व्हिस रोड चे काम देखील पावसाआधी पूर्ण करून घेण्यात येईल. मनसेचे वाहतूक सेना तालुका अध्यक्ष मिलिंद कदम, महाराष्ट्र सैनिक संतोष कदम, संजय वाजे, प्रशांत हटकर, मंगेश महाडिक, रुपेश शेट्ये आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.