पाटण लोक निर्माण (श्रीगणेश गायकवाड )
महिलांना सन्मान दिला तर अन्याय, अत्याचार होणार नाहीत, कुटूंबाच्या मालमत्ता पत्रकात, मुलांच्या कागदपत्रांवर महिलेचे नाव लागले पाहिजे, यामुळे महिलांना सामाजिक, कौटुंबिक सुरक्षा मिळेल, देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत त्यांना भेटून हा कायदा देशात व्हावा यासाठी अभियान सुरु करणार आहे, महिलांच्या समान अधिकारांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळी उठाव केला.घटनेत अनेक अधिकार दिले, मात्र या समान अधिकाराचा वापर आजवर राजकीय पोळी भाजण्यासाठीच केला. यामुळे महिलांचा विकास झाला नाही अशी खंत पुणे येथील मानिनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांनी व्यक्त केली .
दिवशी खुर्द ता. पाटण येथील बाबा अमरनाथ शिवमंदिर (आनंदनगर)येथे महाकाली माताजी महिला मंडळ व समाजसेवा मंडळ यांच्या वतीने आयोजित बैठकीत ग्रामीण महिलांना स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन, महिला सक्षमीकरण या विषयी जनजागृती करताना उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
यावेळी बैठकीस फौंडेशनच्या राज्य कोअर कमिटी सदस्या डॉ. नंदा शिवगुंडे , अर्चना चव्हाण, चित्रा देशमुख, माजी जि. प. उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर, दयानंदगिरी महाराज, माजी पोलिस अधिकारी संभाजीराव पाटणकर, समर्थ सुहास चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक नितीन पिसाळ, माजी जि. प. सदस्या सुषमा साळुंखे, माजी पंचायत समिती सदस्या शोभा कदम, नगरसेविका संज्योती जगताप, पत्रकार संजय कांबळे, अंकुश साळुंखे (फौजी) यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. भारती चव्हाण बोलताना पुढे म्हणाल्या हा दुर्गम भाग असला तरी मुली उच्च शिक्षित आहेत हि विशेष उल्लेखनीय गोष्ट आहे, महिलांच्या कामात मी राजकारण आणायचे नाही, त्याला स्वार्थाचा वास असतो, समाजकारण निस्वाथी करत असतो,
महिलांचे संघटन करण्याची गरज आहे,
महिलांच्या हितासाठी जिथे फायदा असेल अशा कोणत्याही संस्था, संघटनेत काम करा, आपला केंद्रबिंदू एक असला पाहिजे, आपल्या गावचा विकासासाठी प्राधान्य दिले पाहिजे,
आरक्षणाची संधी घेऊन पुढे आलेल्या महिलांनी नेतृत्व केले पाहिजे यातून महिलांना सक्षम करू शकतो, ग्रामसभेला महिला सदस्यांनी हजर राहिले पाहिजे,
महिला सदस्यांना जबाबदारीची जाणीव करून देणे गरजेचे आहे, कुटूंबाच्या मालमत्ता उतारावर महिलांची नावे लागली पाहिजेत, तसा कायदा आहे, तशा जागृतग्रामस्थांनी नोंदणी करूण घेतली पाहिजे. बायको, शिक्षित हुशार असावी मात्र ती चार भिंतीतच असावी अशी मानसिकता समाजात आहे.
घरावर पतीसोबत पत्नीच्या नावाची पाटी लागली पाहिजे, असा उपक्रम हाती घेतला पाहिजे, मग महिलांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल, मुलांना वाटले पाहिजे हे घर बापासह आईचे सुद्धा आहे, मोर्चे, आंदोलने, कँडल मार्च काढले तरी बलात्कार चालू आहेत, समाजप्रबोधन करा म्हणता मग तुम्हीच महिलांना सन्मान द्या, महिलेचे महत्त्व समाजात वाढले पाहिजे. जिवावर उदार होऊन महिला बाळाला जन्म देते, तो तिचा पुर्नजन्म असतो, मात्र मुलाच्या नावापुढे फक्त बापाचे नाव लागते, त्याच्या अगोदर आईचे नाव लागले पाहिजे. तसा कायदा झाला पाहिजे, मुलाच्या जन्मानंतर ते मृत्यू पर्यंत आईचे नाव लागले पाहिजे, सर्व कागदपत्रांवर आईचे नाव लागले पाहिजे तशी मागणी केली आहे, तसे कायदे झालेत मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही. महिलांना कागदोपत्री अधिकार मिळाले पाहिजेत अशी मागणी करत त्या पुढे म्हणाल्या
ग्रामीण भागातील 80 टक्के महिला शेतमजूरी करतात ,मात्र त्यांना निर्णय प्रक्रियेत अर्थ व्यवस्थेत स्थान नाही, देशात यासाठी कायदा होऊ शकतो यामुळे महिला शेत मजूर नव्हे तर शेतमालक होऊ शकतात, महिला शेती प्रक्रिया उद्योगात आल्या पाहिजेत,
मानिनी फौंडेशन माध्यमातून महिलांसाठी काम करायच आहे, गावोगावी,ग्रामीण भागात, आदीवासी पाड्यात महिलांना माझी गरज आहे, महिलांना प्रशिक्षण दिले तर ती उत्तम व्यवसाय करू शकते,
प्रशिक्षण घेऊन शेती केली तर जास्त उत्पन्न मिळेल, यासाठी शेती करणाऱ्या महिलांना प्रशिक्षण देत आहोत. महिलांनी संघटीत होऊन हे उद्योग केले पाहिजेत,आमची महिला सक्षमच आहे परंतू समाजाने मान्य केले नाही, एक महिला सक्षम झाली तर संपूर्ण कुटुंब, गाव राज्य, देश सक्षम होतो. त्याला समाजमान्यता मिळाली पाहिजे, यासाठी गावांनी पुढाकार घेतला तर ते गाव सक्षम होईल ,स्वातंत्र्याचा 70 वर्षांचा काळ लोटून गेला पण महिला सक्षम झाल्या नाहीत. यासाठी अर्थ व्यवस्था हाती घेतली पाहिजे, महिलांना शंभर टक्के आरक्षण दिले तरी तीचे योगदान कुटूंबासाठी राहिल.
या भागात महिलांचे संघटन उभे करा, आमच्या महिला उद्याच्या काळात उद्योजिका म्हणून ओळख निर्माण करतील अशी आशा डॉ. भारती चव्हाण यांनी व्यक्त केली.
विक्रमबाबा पाटणकर म्हणाले या भागातील महिलांना भौगोलिक, सामाजिक परिस्थितीचा संघर्ष करावा लागतोय, हे राबवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे, महिलांच्यासाठी बचतगट केले आहेत यातून , महिला सक्षम झाली पाहिजे आठवड्यात चार पैसे हाती आले पाहिजेत, यासाठी मार्केटींग उभारावे लागेल, तुम्ही कच्चे साहित्य द्या ते तयार करून आमच्या महिला, देतील . महिलांसाठीच्या शासकीय योजनांची बँकांकडून अंमलबजावणी केली जात नाही.
यामुळे निर्माण झालेली उमेद या कारणांमुळे खंडीत होते, याबाबत आवश्यक ती मदत आपण करावी अशी शेवटी विनंती विक्रमबाबा पाटणकर यांनी केली.
या वेळी पोलिस पाटील प्रिती डुबल, जोती देसाई, सिमा चव्हाण, सोमनाथ आग्रे, अनिल बोधे, नवनाथ कदम सर , विशाल निकम यांच्या सह परिसरातील बचतगटाच्या महिला, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्या, महिला उपस्थित होत्या.
स्वागत, सूत्रसंचालन शोभा कदम यांनी केले,
प्रारंभीस प्रास्ताविक संभाजीराव पाटणकर यांनी करून शेवटी आभार मानले.
चौकट @
पक्ष कोणताही असो, कोणत्याही घटकाचा विकास करायचा असेल तर सतेचे विक्रेंद्रीकरण झाले पाहिजे, महिलांना राजकीय 50 टक्के आरक्षण आहे, मात्र, 8.50 टक्के महिलाच राज्यात तर 14 टक्के केंद्रात प्रतिनिधित्व करत आहेत, यात बहुतांशी घराणेशाहीतून आलेल्या महिला आहेत हे वजा केले तर सर्वसामान्य महिलांना शुन्य टक्के आरक्षण आहे. , बाबासाहेबांनी घटनेत महिलांना समान अधिकार, संधी दिली ती संधी महिलांना मिळाली का ...? असा सवाल डॉ भारती चव्हाण यांनी यावेळी उपस्थित केला.
चौकट@ -28 वर्ष राजकीय संघटनेत राष्ट्रीय पातळीवर काम करून सामाजिक पिंड असल्याने बाहेर पडून राज्यभर मानिनी फौंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी मी काम करायला सुरुवात केली, घरोघरी जाऊन दीड वर्षात तीन हजार महिलांचा मेळावा घेतला, जिथे शासकीय यंत्रणा थांबते तेथे मानिनी फौंडेशन काम करते, राज्यभर आम्ही दीड लाख महिलांचे संघटन केले आहे. फौंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी शेती प्रक्रिया उद्योग, कुटीर उद्योग, मधूमक्षिका पालन, हे उद्योग राबवत आहोत, महिलांना मजूर म्हणून नाही तर उद्योजिका म्हणून आपली ओळख निर्माण करण्याची संधी मानिनी फाउंडेशनच्या माध्यमातून मिळणार असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.