रमजान गोलंदाज यांची शासनाच्या जिल्हा ग्राहक संरक्षण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून निवड


प्रशासने रमजान गोलंदाज यांच्या कार्याची घेतली दखल

अनेक स्तरातून रमजान गोलंदाज यांचे कौतुक तर पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी दिल्या शुभेच्छा


संगमेश्वर/ लोकनिर्माण (धनंजय भांगे)



.          रत्नागिरी तालुक्यातील उक्षी गावाचे सुपुत्र,सामाजिक कार्यकर्ते,नवनिर्मिती फाउंडेशन उक्षीचे संस्थापक अध्यक्ष,पत्रकार रमजान गोलंदाज याची शासनाच्या ग्राहक सरक्षण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नुकतीच निवड करण्यात आली असुन त्यांच्या यां झालेल्या निवडीबद्दल अनेक स्तरातून अभिनंदणाचा वर्षाव होत असुन योग्य जागी योग्य व्यक्तीची निवड करण्यात आल्याने अनेकांनी प्रशासनाचे आभार मानले आहे.

.     गेल्या अनेक वर्ष सामाजिक कार्यात काम करत असणारे श्री रमजान गोलंदाज हे तळागाळातील अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम होते. त्यांची नाही सामाजिक कामातून अनेक लोकांशी जोडली गेली असून इतरांची समस्या ही स्वतःची समस्या समजून त्याला न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे. परिसरातील अनेक विषय त्यांनी मार्गी लावले असून समाजामध्ये त्यांचा चांगलेच वजन आहे. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन प्रत्येक धर्मातील आणि प्रत्येक व्यक्तीला आपला व्यक्ती म्हणून त्यांना मदत करण्याच्या भावनेतून रमजान गोलंदाज समाजामध्ये वावरत आहेत. त्यांनी आपली मजबूत कमान ही उभी केली असल्याचे बोलले जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ग्राहक संरक्षण समितीच्या अशासकीय सदस्य पदी त्यांची निवड झाल्यामुळे परिसरामध्ये त्यांच्यावर आनंदाचा वर्षाव होत आहे. ग्राहक संरक्षण समिती वरती रमजान यांची निवड झाल्यामुळे समाजातील अडचणीत आणि समस्याने ग्रासलेल्या ग्राहकाला नक्कीच न्याय मिळेल असा विश्वास काही लोकांनी व्यक्त केला आहे. रमजान मुलांच्या सामाजिक कार्याची दखल घेत प्रशासनाने जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी ग्राहक समिती वरती नेमल्याने त्यांचे आभार मानले आहे.

Popular posts
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
Image
पहलगम घटनेच्या निषेधार्थ यवतमध्ये सर्व धर्मीय कँडल मार्च काढून तीव्र निषेध
Image
महाराष्ट्र ज्ञान महामंडळतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करून कोर्सचे अपग्रेडेशन — डिजिटल व AI Divide दूर करण्याचा निर्धार
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image