राजापूरच्या सुपुत्राने अल्सर वरील औषध तयार करण्यात मिळवले यश

 

राजापूर /लोकनिर्माण (सुनील जठार )

राजापूर तालुक्यातील शीळ गावाचा सुपुत्र व सध्या नवी मुंबई कोपरखैरणे येथील गहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे शिक्षण घेत असलेल्या साहिल प्रकाश बाईत याने सहकारी विद्यार्थी व प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली

'हर्बल बक्कल' फिल्म अंतर्गंत 'अल्सिक्युअर' हे अल्सरवरील औषध तयार केले आहे. तोंडातील व्रण, कॅन्कर फोड व तोंडाचा ओरखडा हे वेदनादायक व क्लेशदायक असून दाह कमी वेळेत बरे होण्याच्या अनुषंगाने हे औषध महत्त्वपूर्ण ठरणार आहे

संशोधन इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन,महाराष्ट्र राज्य शाखा, स्टुडंट फोरम यांच्यावतीने बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी येथे आरएक्स वैज्ञानिक पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा नुकतीच आयोजित केली होती. त्यात साहिल व सहकारी विद्यार्थ्यांनीदुसरा क्रमांक पटकावला. औषधी वनस्पती, सुवासिक पानांचे एक सदाहरीत झुडूप, लवंग व मिसवाक या सामान्य वनस्पती असून त्यांचा विविध दंत उपचारात वापर केला जातो. लवंग, मिसवाक व रोझमेरीच्या अर्कांचा उपयोग करीत गहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे सहाय्यक प्रा. दीपक तंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी 

साहिल बाईत, कृष्णा अग्रहरी, प्रिती बागूळ, रोहिणी अतपडकर, सौरभ आलाटे, साक्षी गुरव यांनी बक्कल फिल्म अंतर्गत नवोपक्रमांतर्गंत 'अल्सिक्युअर' हे औषध तयार केले आहे.

मौखिक अल्सरच्या उपचारांसाठी लवंग, मिसवाक व रोझमेरीच्या अर्कांच्या मिश्रणाच्या सहाय्याने तयार केलेल्या हर्बल अर्कमुळे प्रतिजैविक क्रिया वाढताना व तोंडातील व्रण (अल्सर) बरे झाल्याचे निदर्शनास आले आहे. 


Popular posts
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
Image
पहलगम घटनेच्या निषेधार्थ यवतमध्ये सर्व धर्मीय कँडल मार्च काढून तीव्र निषेध
Image
महाराष्ट्र ज्ञान महामंडळतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करून कोर्सचे अपग्रेडेशन — डिजिटल व AI Divide दूर करण्याचा निर्धार
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image