लोकनिर्माण चे संपादक श्री. बाळकृष्ण कासार नानासाहेब जोशी स्मृति संपादक सन्मान पुरस्कारांने सन्मानित

  

मुंबई लोकनिर्माण  प्रतिनिधी 

नानासाहेब जोशी स्मृति संपादक सन्मान पुरस्कार  लोकनिर्माण वृत्तपत्राचे संपादक श्री. बाळकृष्ण कासार यांना मार्मिक चे कार्यकारी संपादक मुकेश  माचकर यांच्या हस्ते आणि मा. माहिती आणि जनसंपर्क उपसंचालक संभाजी खराट,  मा.  संचालक देवेंद्र भुजबळ यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.   




एजेएफसी ही राष्ट्रीय पत्रकार संघटना आहे. ही संघटना गेली १६ वर्ष पत्रकारांच्या समस्यांसाठी काम करत आहे. या संघटनेत विविध माध्यमांचे दोन हजार हून जास्त पत्रकार सदस्य आहेत. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करत आहे. कमी मानधनात तो जीवाची बाजी लावून बातम्या प्रसिद्ध करत असतो.  त्यांच्या पाठीवर कर्तव्याची थाप मारून त्यांना प्रेरणा देण्यासाठी राज्यातील विविध कर्तृत्ववान पत्रकारांच्या नावाने संघटनेत काम करणाऱ्या कर्तृत्ववान पत्रकाराना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. असाच पुरस्कार दैनिक सागरचे संपादक कै. नानासाहेब जोशी यांच्या स्मरणार्थ  चिपळूण मधील जेष्ठ पत्रकार आणि लोकनिर्माण वृत्तपत्राचे संपादक  बाळकृष्ण कासार यांना देऊन सन्मानित करण्यात आले. 



      बाळकृष्ण कासार हे लोकनिर्माण वृत्तपत्रातून  समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असतात.  त्यांना आता पर्यंत ३२ राज्य, तीन राष्ट्रीय आणि दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये अजून एका अतिमहत्त्वाच्या पुरस्काराची भर पडली आहे.  



      हा पुरस्कार सोहळा ग्रॅंट रोड, नाना चौक येथील गांधी बुक सेंटर येथे संपन्न झाला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल, केंद्रीय अध्यक्ष गणेश कोळी, प्रदेशाध्यक्ष ईश्वर हुलवान, राज्य संघटक दिनकरराव पतंगे, निसार अली सय्यद, गोविंदसिंग राजपूत,  महादेव माने, रायगड भूषण प्रा. एल. डी. पाटील, निलेश पोटे, विठ्ठल मोघे, किरण बाथम, शशिकांत सावंत, प्रसाद शेट्ये इ. मान्यवर उपस्थित होते.