संगमेश्वर लोकनिर्माण/सत्यवान विचारे
राज्यात एकाचवेळी प्रकाशित होणारे सर्वसामान्यांचा आवाज म्हणुन ओळखले जाणारे लोक निर्माण वृत्तपत्राची ओळख असणारे लोकनिर्माण या वृत्तपत्राद्वारे प्रतिवर्षी एक मे या कामगार दिनी गुणवंत कामगारांचा आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना हिरकणी पुरस्काराने सन्मानित केले जाते. या वर्षाचा सन्मान सोहळा नुकताच देवरुख येथील हॉटेल पार्वती पॅलेसच्या सभागृहात पार पडला. त्यावेळी वीसहुन अधिक जणांना देवरुखचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, एजेएफसी या राष्ट्रीय पत्रकार संघटनेचे संस्थापकिय अध्यक्ष यासीन पटेल, संपादक बाळकृष्ण कासार आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी पंचायत समिती बांधकाम विभाग, वैद्यकीय विभाग देवरुख, महावितरण मधे काम करणारे, सामाजिक क्षेत्रात काम करणारे अशा गुणवंत कामगारांना *गुणवंत कामगार* पुरस्कार तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना *हिरकणी* पुरस्कार सन्मान देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला ठाणे, मुंबई, सातारा, पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यातून अनेक मान्यवर उपस्थित होते.
या वेळी लोकनिर्माण वृत्तपत्राचे संपादक श्री. बाळकृष्ण कासार, देवरुखचे तहसीलदार श्री. सुहास थोरात, गटविकास अधिकारी श्री. भरत चौघुले, ऑल जर्नालिस्ट अँड फ़्रेंड सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. यासिन पटेल, सह संपादक श्री. युयुत्सु आर्ते, सत्यवान विचारे, विशाल रापटे, मेहरून्निसा साखरकर, हर्षद गुरव इ. मान्यवर उपस्थित होते.