पाटण लोकनिर्माण ( विनोद शिरसाठ )
कोयना एज्युकेशन सोसायटी पाटण संचालित श्रीमंत दादासाहेब पाटणकर हायस्कूल म्हावशी या शाळेने एन.एम.एम.एस. २०२२-२३ या शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश संपादन केले असून एकूण ६९ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून ४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.
श्रीमंत दादासाहेब पाटणकर हायस्कूल म्हावशी या शाळेने दरवर्षीप्रमाणे यंदा ही एन.एम.एम.एस. या शिष्यवृत्ती परीक्षेत यश प्राप्त केले असून खुल्या प्रवर्गातून प्रेम विठ्ठल कवर व कु. स्वरांजली प्रकाश घाडगे तर इतर मागास प्रवर्गातून कु. प्राची प्रकाश सुतार व ओमकार बाळासो कुंभार या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली असून सदर विद्यार्थ्यांना प्रत्येकी साठ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. श्रीमंत दादासाहेब पाटणकर हायस्कूलचे जे. एस.मोहिते ,पी. एस.साळुंखे,पी. एन.पवार , एस. ए.भुसारी व सतीश चव्हाण या शिक्षकांनी परिश्रम घेवून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले.
सदर यशस्वी विद्यार्थ्यांचे कोयना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण, उपाध्यक्ष प्रकाशभाऊ पाटील, जनरल सेक्रेटरी श्रीमंत अमरसिंह पाटणकर, संचालक संजीवदादा चव्हाण,श्रीमंत याज्ञसेन पाटणकर, श्रीमंत दादासाहेब पाटणकर हायस्कूलचे मुख्याध्यापक जयवंत मोहिते, विद्यालयातील सर्व शिक्षक, प्रशासकीय सेवकवर्ग यांनी अभिनंदन केले.