वेगवेगळी कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक : डॉ. आर. जी. पवार

 

पाटण लोकनिर्माण( श्रीगणेश गायकवाड )

आजच्या स्पर्धेच्या युगात जर विद्यार्थ्यांना टिकून राहायचे असेल तर आपली शैक्षणीक गुणवत्ता तर वाढवली पाहिजे पण वेगवेगळ्या कोर्स च्या माध्यमातून वेगवेगळी कौशल्ये सुद्धा आत्मसात करणे आवश्यक आहे  असे मत आजीवन शिक्षण व विस्तार विभागाचे संचालक डॉ. आर. जी. पवार यांनी व्यक्त केले. ते बाळासाहेब देसाई कॉलेजमध्ये करियर कोर्स मार्गदर्शन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून  बोलत होते.



कोयना एजुकेशन सोसायटीच्या बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण मध्ये करियर कोर्स मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आजीवन शिक्षण व विस्तार विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे  संचालक डॉ. आर. जी. पवार हे होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. पवार होते. प्रमुख उपस्थिती म्हणून जिमखाना उपाध्यक्ष डॉ. भरत जाधव एन.एस.एस. कॉ –ऑर्डीनेटर डॉ. जी. एस. पट्टेबहादूर व करियर कोर्स कॉ –ऑर्डीनेटर डॉ. एस.एस. पवार  होते.

सदर कार्यक्रमाचे  प्रास्ताविक डॉ. डॉ. जी. एस. पट्टेबहादूर यांनी केले. त्यामध्ये ते म्हणाले की,विद्यापिठ  मार्फत राबविलेले विविध कोर्स  याबाबत माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी या कार्याक्रमचे आयोजन करण्यात आले असून महाविद्यालयात सुरु असलेले  विविध कोर्स याची थोडक्यात माहिती दिली.त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. आर.जी.पवार म्हणाले की, वाणिज्य शाखेला भविष्यात खूप संधी आहेत आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी स्वतःचा व्यक्तिमत्व विकास केला पाहिजे स्वतःचे वेगळेपण जपले पाहिजे त्याचबरोबर आवश्यक असणारी कौशल्य सुद्धा आत्मसात करणे आवश्यक बनले आहे त्याच पद्धतीने आजीवन शिक्षण विभागामार्फत वेगवेगळे कोर्सेस राबविले  जातात. एकूण 64 कोर्सेस सुरू आहेत ते सुद्धा कमीत कमी फी मध्ये आजीवन शिक्षण विभागामार्फत बालवाडी शिक्षिका पासून गांडूळ खत निर्मिती, योगा कोर्सेस, पत्रकारिता, ट्रॅव्हल अँड टुरिझम असे वेगवेगळे कोर्सेस सुरू आहेत. ज्या माध्यमातून विद्यार्थी आपला व्यवसाय सुरू करू शकतात. त्याचबरोबर असे म्हणाले की विद्यार्थ्यांनी स्वतःचा अभ्यास केला पाहिजे म्हणजे स्वतःला कोणत्या क्षेत्रामध्ये आवड आहे हेच तपासले पाहिजे म्हणजे त्या दृष्टिकोनातून त्यांना  करियर साठी प्रयत्न करणे  सोपे जाते. डॉ. पवार यांनी पीपीटी च्या माध्यमातून आजीवन शिक्षण विभागाचे वेगवेगळे कोर्सची माहिती सांगितली.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य  डॉ. एस. डी. पवार म्हणाले की नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना विषय निवडीमध्ये स्वातंत्र्य असणार आहे. ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रकारचे मार्गदर्शन मिळाले. नवीन शैक्षणिक बदल हे स्वीकारणे गरजेचे आहे. करिअर ओरिएंटेड कोर्सेस च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकासच होत असतो त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान योग्य रीतीने वापरावे असे आवाहन त्यांनी केले कार्यक्रमाचे आभार इंग्रजी विभाग प्रमुख डॉ एस. एस. पवार यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी प्रा. ए.एल. मोहिते, प्रा. श्रीगणेश गायकवाड, प्रा.अरुण शिर्के व श्रीरंग जंगम यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होत्या.