राजापूर अर्बन को-ऑप. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांना '7th All India Urban Cooperative Banking Award 2023' चा 'Best MD / CEO of the Year' पुरस्कार जाहीर


राजापूर  लोकनिर्माण टीम 


शतकोत्तर प्रगती साधणा-या राजापूर अर्बन को-ऑप. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी / मॅनेजिंग डायरेक्टर शेखरकुमार अहिरे यांना देश पातळीवरील व्यावसायिक नेतृत्व करणारी 'B2B Infomedia, Ghaziabad' या संस्थेचा '7th All India Urban Cooperative Banking Award 2023' चा 'Best MD / CEO of the Year' हा पुरस्कार जाहीर झाला असून तो मुंबई येथे दि. १४ जून २०२३ रोजी हॉटेल ललित येथे प्रदान करण्यात येणार आहे.

     आर्थिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तिंना त्यांच्या नैपुण्यतेचा आणि अभ्यासू कार्यपध्दतीचा विचार करण्यात आल्याने महाराष्ट्रातील कर्तुत्ववान नेतृत्व म्हणून त्यांना गौरविण्यात येणार आहे. या पुरस्काने त्यांच्या वैयक्तिक पुरस्कार यादीत आणखी एका पुरस्काराची नोंद झाली असून त्यांच्या पुरस्कार गौरवात मानाचा तुरा खोवला गेला आहे. शेखरकुमार अहिरे हे गेल्या पंधरा वर्षात राजापूर अर्बन बँकेची धुरा सांभाळताना बँकेला यशस्वी उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी मोलाचे योगदान व नेतृत्व करीत आहेत. शेखरकुमार अहिरे यांनी सदर पुरस्कार हे संघभावनेने केलेल्या कामाचे द्योतक असुन मिळणारे सर्व पुरस्कार बँकेचे संचालक मंडळ, कर्मचारी वृंद व बँकेच्या सभासद, ग्राहकांना सर्मपित करीत असल्याची भावना नेहमीच जोपासत आहेत.

    श्री.अहिरे यांना यापूर्वी विविध संस्थांनी अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून या जाहीर झालेल्या आणखी एका पुरस्काराने त्यांचे सर्व स्तरातून व बँकींग क्षेत्रातील मान्यवरांकडून विशेष कौतुक व अभिनंदन केले जात आहे. बँकेसाठी सदर पुरस्कार हे अभिमानास्पद आणि भुषणावह आहेत. या पुरस्कारांबद्दल अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळाचे सदस्य व कर्मचारी वृंद यांचेकडून अभिनंदन करण्यात येत आहे व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.