चिपळूण तालुक्यातील ओमळीतील ११ वर्षीय मुलासह तरूणाचा डोहात बुडून दुर्देवी मृत्यू

 

चिपळूण लोकनिर्माण प्रतिनिधी 



 तालुक्यातील ओमळी गोंधळेवाडी येथील ११ वर्षाचा मुलगा आणि २३ वर्षाच्या तरूणाचा खांदाट- पाली येथे वाशिष्ठी नदीच्या मारुती मंदिर जवळ असलेल्या डोहात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना सोमवारी दुपारी घडली होती. मंगळवारी दोघांचेही मृतदेह पाली डोहात आढळले. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

    याबाबत पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओमळी गोंधळेवाडी येथील विक्रम रविंद्र देवांग (२३) व हर्षल अनिल यादव (११) हे दोघे सोमवारी सकाळी मासेमारी करण्यासाठी पाली मारुती मंदिरजवळच्या वाशिष्ठी नदीच्या डोहात उतरले होते. त्यांची दुचाकी, मोबाईल व अन्य वस्तू पाली पुलावर होत्या. सकाळी घराबाहेर पडलेले दोघेही रात्रीपर्यंत घरी न आल्याने रात्री उशीरा चिपळूण पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची फिर्याद देण्यात आली होती. त्यानुसार पोलीस त्यांचा शोध घेत असताना मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान हर्षल यादवचा मृतदेह आढळला.

पाली ग्रामस्थांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला. तर विक्रम देवांग याचाही काही वेळाने डोहात मृतदेह आढळला. पाचवीत शिकणाऱ्या हर्षलला पोहता येत नव्हते. कदाचित तो बुडताना त्याला वाचविताना विक्रमही बुडाला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. 

Popular posts
युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था, दहिवली तर्फे या वर्षी अगदी वेगळ्या पध्दतीने रक्षाबंधन सण साजरा
Image
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
Image
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
महाराष्ट्र ज्ञान महामंडळतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करून कोर्सचे अपग्रेडेशन — डिजिटल व AI Divide दूर करण्याचा निर्धार
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image