राजापूर/लोकनिर्माण (सुनील जठार)
दि. ०७/०६/२०२३ रोजी राजापूर तालुक्यात राहणाऱ्या एका ५२ वर्षीय आरोपीने एका व्हॉट्सअॅप गृपवर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत करुन त्याद्वारे महापुरुषांचा अवमान करुन, जनसमाज यांच्यामध्ये एकोपा टिकण्यास बाधक असे कृत्य केल्याची गोपनीय माहिती मिळताच त्याची गांभीर्यपुर्वक दखल घेवून रत्नागिरी जिल्हा पोलीसांनी सरकारतर्फे फिर्यादी होवून भादंविक १५३(१)(अ)(ब). ५०५(२) प्रमाणे दि. ०७/०६/२०२३ रोजी १९.१६ वा. राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्हयातील आरोपीस तात्काळ अटक करण्यात आलेली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक, सुधीर उबाळे, राजापूर पोलीस ठाणे हे करीत आहेत.
रत्नागिरी पोलीस दलामार्फत आवाहन
कोणत्याही जाती अथवा धर्माच्या भावना दुखावतील असे फोटो, मजकुर सोशल मिडीयावर (फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, ट्वीटर) पोस्ट करु नयेत, फॉरवर्ड करुन नयेत. अशा प्रकारच्या कृत्यांवर रत्नागिरी पोलीस दलाच्या सायबर पोलीस ठाणे व सोशल मिडीया सेलची करडी नजर असून अशा व्यक्तींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. > कोणी जाणीवपूर्वक असे कृत्य करीत असल्यास सायबर पोलीस स्टेशन मो.नं. ८८३०४०४६५० व पोलीस नियंत्रण कक्ष फोन नं. ०२३५२-२२२२२२ या नंबरवर संपर्क करावा. → कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
सामाजिक सलोखा राखण्यास सहकार्य करा.
कोणत्याही समाजविघातक कृत्यांमध्ये सहभागी होवू नका.
www.konkantoday.com