सुमन विद्यालय टेरवचा इयत्ता दहावी निकाल १००%

 

चिपळूण लोकनिर्माण जमालुद्दीन बंदरकर 



 जय भवानी एज्युकेशन सोसायटी संचलित सुमन विद्यालय, टेरव या प्रशालेचा इयत्ता दहावीचा निकाल १००%  लागला असून प्रतिवर्षाप्रमाणे उज्वल निकालाची परंपरा  प्रशालेने  कायम राखली आहे. या परीक्षेत कुमार आर्यन निलेश शिरकर या विद्यार्थ्याने ९३.००% गुण मिळवून प्रथम क्रमांक तसेच कुमार आदित्य अनंत कदम ८५.००% गुणांसह द्वितीय क्रमांक आणि कुमार दिलीप श्रीमंत राठोड याने ८२.८०%  गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. यावर्षी सदर परीक्षेला एकूण ४० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १६ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीमध्ये, २१ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये आणि २ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणीमध्ये यश संपादित केले आहे. प्रशालेने  उज्वल निकालाची परंपरा कायम राखल्याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी, मुख्याध्यापक व मार्गदर्शक शिक्षक यांचे जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. विकास कदम, सचिव श्री. प्रकाश कदम, खजिनदार श्री.अजित कदम तसेच संस्थेचे सर्व संचालक, सभासद, ग्रामस्थ, पालक यांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.