रत्नागिरी प्रतिनिधी
. घरेलू कामगारांसाठी ज्या कल्याणकारी योजना आहे. त्या योजनांचा लाभ त्यांना मिळावा या दृष्टीने मंत्रीमहोदय तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री श्री. उदयजी सामंतसाहेब तसेच रत्नागिरीतील ज्येष्ठ उदयोजक श्री. किरणशेठ सामंत यांच्या संकल्पनेतून नक्षत्र गार्डन सन्मित्रनगर येथे रोजगार कार्यालयात हे फॉर्म उपलब्ध करुन घरेलू कामगारांकडून भरुन घेण्यात आले. घरेलू कामगारास २ अपत्यांपर्यंत प्रत्येक प्रसूतीकरीता रु. ५०००/- इतकी मदत दिली जाते. तसेच ज्या नोंदीत घरेलू कामगारांची वयाची ५५ वर्षे पूर्ण केली आहेत अशा नोंदीत घरेलू कामगारांना सन्मानधन योजनेंतर्गत प्रत्येकी रु.१०,०००/- देण्यात येतात. अत्यंत अल्पावधीतच रत्नागिरी शहरातील १८० च्या दरम्यान अर्ज भरुन घेण्याची कार्यवाही सुरु असून अद्याप या कार्यालयातून ३०० घरेलू कामगारांचे अर्ज भरून घेण्यात आले आहे. घरेलू कामगारांना अंत्यविधी सहाय्य म्हणजेच घरेलू कामगार मयत झाल्यास कामागाराच्या कायदेशीर वारसास रु. २०००/- अंत्यविधी सहाय्य उपलब्ध करुन दिले जाते. या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे म्हणजे १८ते ६० वयोगटातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. नोंदणी शुल्क ही याच कार्यालया मार्फत भरली जाते. अर्जदाराचा फोटो आवश्यक, बँक पासबुक प्रत आवश्यक, सध्या काम करीत असलेल्या मालकाचे प्रमाणपत्र किंवा स्वयं प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे. याबाबत रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. उदयजी सामंतसाहेब, ज्येष्ठ उदयोजक श्री. किरण उर्फ भैयाशेठ सामंत यांनी रत्नागिरी तालुक्यातील जे घरेलू कामगार आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेण्याबाबत आवाहन केले असून त्यासाठी नक्षत्र गार्डन सन्मित्रगर येथील कार्यालयात संपर्क साधावा असे कळविले आहे.