रोख रक्कम आणि महत्वाची कागदपत्र असलेली बॅग प्रवाशाला केली परत - वाहक सुशांत आंब्रे यांची कौतुकास्पद कामगिरी

 

चिपळूण लोकनिर्माण प्रतिनिधी 

रोख रक्कम आणि महत्वाची कागदपत्र असलेली बॅग चिपळूण आगाराचे वाहक सुशांत आब्रे यांनी प्रवाशाला  परत केली आहे. सुशांत आंब्रे यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

   

मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची विसरून एस.टी.बसमध्ये राहिलेली बॅग मालकाचा शोध घेऊन वाहक सुशांत आंब्रे यांनी त्यास परत केली. बॅगेत रोख रक्कम होती. आंब्रे यांच्या या प्रामाणिकपणाविषयी येथील आगार प्रशासनाकडून कौतुक होत आहे. शनिवारी येथील आगारातून सकाळी ८ वाजता चिपळूण-मुंबई सेंट्रल शिवशाही बसगाडी मुंबई सेंट्रल निघाली. यावेळी प्रवास करणारे अरुण महाडिक हे ती बॅग या बसगाडीत विसरून मैत्री पार्क येथे उतरले.

    बसगाडी मुंबई सेंट्रलला पोहचल्यानंतर वाहक आंब्रे यांना ही बॅग दिसली. त्यांनी तत्काळ बॅग मालकाचा शोध घेत महाडिक यांच्याशी संपर्क साधला. या बॅगेत औषधे, बँकेचे पासबुक व चेक बुक, रोख रक्कम, मोबाईल चार्जर असे साहित्य होते. अखेर बॅग मालक मुंबई सेंट्रल येथे आल्यानंतर त्यांची बॅग त्यांना परत देण्यात आली.



 

Popular posts
युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था, दहिवली तर्फे या वर्षी अगदी वेगळ्या पध्दतीने रक्षाबंधन सण साजरा
Image
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
Image
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
महाराष्ट्र ज्ञान महामंडळतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करून कोर्सचे अपग्रेडेशन — डिजिटल व AI Divide दूर करण्याचा निर्धार
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image