सुंदरगडावर छत्रपती शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

 सुंदरगडावर छत्रपती शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात


        पाटण /लोकनिर्माण ( श्रीगणेश गायकवाड )

 पाटण महालातील प्रमुख असलेल्या किल्ले सुंदरगड - दातेगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पाटण तालुक्यातील पंचगंगा- कोयना, मोरणा, तारळी, वांग, केरा या नद्यांच्या पाण्याने जलाभिषेक व दुग्धाआभिषेक घालण्यात आला. शिवप्रतिमेचे पुजन करून शिवगर्जनाच्या निनादात पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी शिवगर्जनांनी सुंदरगड दुमदुमून गेला. 



         दरम्यान शिवप्रेमी, शिवभक्तांनी सकाळी लवकर गडावर जाऊन गडावर जाणारी पायवाट, खंजीर दरवाजा याची स्वच्छता केली. गडतोरण, गडपुजन, देवदेवतांचे पुजन करून प्रत्यक्ष छत्रपती शिवराज्याभिषेक सोहळ्यास सुरवात झाली. अविनाश (काका) पराडकर यांनी मंत्रोच्चार सुरु केला. यावेळी छत्रपती शिवप्रतिमेस शिवप्रेमी मनोहर यादव, शंकर मोहिते, मयूर उबाळे, कोमल मांडवकर, संतोष मांडवकर यांच्या हस्ते पंचगंगा जलाभिषेक, दुग्धाआभिषेक घालण्यात आला. तसेच प्रतिमेचे विधीवत पुजन करुन शिवप्रतिमेवर शिवगर्जनाच्या निनादात पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी शिवगर्जनांनी सुंदरगड दुमदुमून गेला. या शिवराज्याभिषेक सोहळ्यास व्यकंटराव माने- चरेगाव, बाजीराव जगदाळे- शिरवडे, अरुण पवार- उडतारे, राजेंद्र साळुंखे, पत्रकार नितीन खैरमोडे, सुरेश संकपाळ, शिवभक्त प्रकाश पवार, वैभव देशमुख, धनंजय देशमुख, निनू साळुंखे, वैभव मांडवकर, विनय मांडवक, प्रकाश कंदारे, कृष्णा भोसले, अमित मानसिंग यांच्यासह मोठ्या संख्येने शिवप्रेमी, शिवभक्त उपस्थित होते.  मांडवक, प्रकाश कंदारे, कृष्णा भोसले, अमित मानसिंग यांच्यासह मोठ्या संख्येने शिवप्रेमी, शिवभक्त उपस्थित होते.