दहावी निकालात न्यू इंग्लिश स्कूल इंग्लिश मीडियम कसबा शाळेचे नेत्रदिपक यश..!


संगमेश्वर/लोक निर्माण ( धनंजय भांगे )





    विशेष अभिनंदनीय बाब म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी  उत्तुंग यश संपादन केले आहे. जादा तासांचे आयोजन, सराव पेपर, तज्ज्ञ व उच्चशिक्षित अध्यापक वर्गाच्या प्रयत्नांचे फळ म्हणून या यशाकडे पाहिले जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे ५० पैकी २५  विद्यार्थ्यांनी ७०% पेक्षा जास्त गुण मिळवत नेत्रदिपक यश संपादन केले आहे.

      संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कॅप्टन अकबर खलपे, उपाध्यक्ष नियाज कापडी, उपाध्यक्ष इब्राहिम काझी, सचिव सईद उपाद्ये, सहसचिव शौकतअली खलपे , खजिनदार शुकूर गैबी, सर्व सदस्य, मुख्याध्यापिका आस्मा एम. जुवळे, प्रायमरी मुख्याध्यापिका गुलशन बेग  यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

विद्यालयातून प्रथम क्रमांक कुमारी फातिमा इंन्तेकाफ अलजी- ८८.२०%


द्वितीय क्रमांक कुमारी भुमीका किशोर शर्मा  - ८६.२०%


तृतीय क्रमांक कुमारी  क्रांती दिपक तांबे ८६.00%


चतूर्थ क्रमांक कुमारी संजना प्रशांत पारकर - ८३.४०%*


पाचवा क्रमांक कुमारी आयेशा अझहर खान - ८३.२०%

      विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या अपेक्षा पूर्णत्वाला नेत मुख्याध्यापिका आस्मा एम.जुवळे यांच्या नेतृत्वात शाळेने गेल्या अनेक वर्षापासून उत्कृष्ट निकाल लावत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. या यशाबद्दल पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पालक व सुजाण नागरिकांकडून शिक्षक व विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.