खेड लोकनिर्माण प्रतिनिधी
शुक्रवार दिनांक ९ जून २०२३ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राज साहेब ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष सचिनजी गोळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष मा जितेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली खेडचे तालुका उपाध्यक्ष तसेच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना रत्नागिरी चिटणीस संदिप फडकले यांची महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेच्या महाराष्ट्र राज्य चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली.
गेल्या अनेक वर्षांपासून संदीप फडकले हे सामाजिक कामे करत आहेत.लोटे एमआयडीसी मधील कामगारांचे प्रश्न सोडवत आहेत.तसेच पक्ष वाडीसाठी खूप मेहनत घेत आहेत.लोटे एमआयडीसी मधील अनेक कंपन्या मधून सीआरसी फंडातुन ३५ गावामध्ये पाणी साठवण टाक्या उपलब्ध करून दिल्या आहेत.सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात संदीप फडकले यांनी उल्लेखनीय काम केले आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत असतात. वरील कामाची दखल घेत मनसे पक्ष प्रमुख सन्मानीय राज साहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेच्या महाराष्ट्र राज्य चिटणीस पदी काम करण्याची एक संधी दिली आहे.वरील पदाचे लेटर महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष सचिनजी गोळे साहेब यांनी संदीप फडकले साहेब यांना दिले.पद नियुक्ती झाल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील मधून,खेड तालुका मधून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.जबाबदारी घेऊन कामे करणार असे संदीप फडकले यांनी सांगितले.