पनवेल तालुक्यात श्री रायगड ॲग्री मिशन नवकृषक फार्मर प्रोडूसर कंपनीची स्थापना - सौ प्रियंका प्रमोद लांगी --अध्यक्ष श्री राजू कदम सचिव व विलास नरहर पुंडले यांची खजिनदार पदी निवड

 

पनवेल लोकनिर्माण प्रतिनिधी 



रायगड जिल्हा हा  मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो. पूर्वी या जिल्ह्याला भाताचे कोठार म्हणून ओळखले जायचे. परंतु वाढत्या औद्योगीकरणामुळे पनवेल तालुक्यातील शेती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

    यासाठी पनवेल तालुक्यातील काही मित्रांनी एकत्र येऊन.  श्री रायगड ॲग्री मिशन  ( " श्रीराम " ) नवकृषक फार्मर प्रोडूसर कंपनीची स्थापना केली. पनवेल तालुक्यातील शेतीची पुनर्बांधणी करावी व सामान्य शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा याकरता केंद्र सरकारचा कंपनी कायदा 1956 कलम 581  A  ते 581 ZT  नुसार शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करण्यात आली.

    पनवेल तालुक्यात अशा प्रकारे काम करणारी ही पहिलीच कंपनी आहे.  याकरता दिल्ली येथून टॉरेंजीएस संस्थेची मदत घेतली आहे. तसेच रायगड जिल्हा कृषी विभागाने देखील याकरता सहकार्य केले आहे. दिनांक १९ जून २०२३ रोजी कंपनीच्या कंपनीच्या प्रथम सभेत सौ प्रियंका प्रमोद लांगी यांची कंपनीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. तर श्री राजू कदम यांची सचिव व श्री विलास नरहर पुंडले यांची खजिनदार या पदी निवड झाली आहे.

     या सर्व प्रक्रियेत टोरेंजीएस दिल्लीमार्फत श्री विजेंद्र सिन्हा व श्री रवींद्र पाटील पेण यांनी मार्गदर्शन केले आहे व स्थानिक पातळीवर श्री प्रमोद तुकाराम लांगी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

     पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात लागणारी खते व बियाणे सवलतीच्या दरात उपलब्ध करून देणे हा कंपनीचा मुख्य उद्देश आहे. तसेच खरेदी करताना दलालांकडून फसवणूक होते ती थांबावी शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा. कंपनीमार्फत नवीन उत्पादन घेणे, हार्वेस्टिंग करणे, ग्रेडिंग करणे, पुलिंग करणे, माल एका ठिकाणी जमा करणे, मालाची हाताळणी करणे, मालावर प्रक्रिया करणे, विपणन म्हणजेच मार्केटिंग करणे. मोठ्या प्रमाणात मालाची विक्री करणे. उत्पादकांना अधिक चांगले उत्पादन मिळवून देणे. लघु उत्पादकांचे मोठे गट तयार करून त्यांच्यात एक मोठी शक्ती निर्माण करणे. त्या सर्वांचा माल एकत्र करून त्यामालाला चांगला भाव मिळवून देणे. शेतकऱ्यांच्या पिकांसाठी लागणाऱ्या विविध बाबी जसे खते बियाणे ,पिक संरक्षण औषधी, छोट्या मोठ्या मशनरी ,अवजारे ,शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तू मोठ्या प्रमाणात व कमी किमतीत आयात करून देणे. यासाठी श्री रायगड ॲग्री मिशन(श्रीराम ) फार्मर प्रोडूसर कंपनी प्रयत्नशील राहील.

   शेतीसाठी लागणारा खर्च कमीत कमी करण्याचा प्रयत्न करणे .उत्पादनात वाढ करून जास्त नफा मिळवून देणे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचा वेळ आणि मेहनत वाचवणे हे कंपनीचे उद्दिष्ट असणार आहे.

     सर्वात महत्त्वाचे शासनामार्फत मिळणाऱ्या योजना सहजरीत्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे. शेतकरी उत्पादक कंपनीला हे सर्व करण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणात मदत करते. शेतकरी उत्पादक कंपनीच्या मदतीने ही कामे करता येतील. त्यामुळे शेतकऱ्याला भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो.

  कंपनीच्या प्रथम सभेस श्री. संदेश गायकवाड, श्री. रविंद्र कदम,श्री.विजय भगत श्री.अरुण भोपी, श्रीमती कुंदा जठार, श्री बाळकृष्ण पाटील, सौ.जानसी वझरकर, श्री नागेश कदम हे सर्व संचालक उपस्थित होते.

      भारताचे पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदी  यांच्या शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या धोरणानुसार भारतामध्ये १०,०००  फार्मर प्रोडूसर कंपन्या स्थापन करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून श्री रायगड ॲग्री मिशन (श्रीराम ) फार्मर प्रोडूसर कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.