चिपळूणचे नवे प्रांताधिकारी म्हणून आकाश लिगाडे रुजू

 

 चिपळूण लोकनिर्माण टीम  



रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणचे नवे प्रांताधिकारी म्हणून आकाश लिगाडे रुजू झाले आहेत. काल मंगळवारी त्यांनी मावळते प्रांताधिकारी प्रविण पवार यांच्याकडून पदभार स्विकारला आहे.

मूळचे सोलापूरचे असलेले आकाश लिगाडे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१० च्या बॅचमधून तहसीलदार म्हणून कारकीर्द सुरु झाली. विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. आकाश लिगाडे हे चिपळूण येथे बढतीने प्रांताधिकारी म्हणून नियुक्त झाले आहेत. मावळते प्रांताधिकारी प्रविण पवार व नवे प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांना शुभेच्छा देण्यासाठी वनाधिकारी सचिन निळख, तहसीलदार प्रविण लोकरे, निवासी नायब तहसीलदार समीर देसाई, भास्करराव जाधव यांचे स्वीय सहाय्यक संतोष तांदळे व महसूलचे सर्व कर्मचारी हजर होते.