लाेकनिर्माणच्या बातमीची दखल घेत धामेली गावातील चिंचेजवळील माेरीचे बांधकाम बांधकाम विभागामार्फत सुरू हाेणार


 

 

                        

  चिपळूण तालुक्यातील धामेली गावातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य रस्त्यावरील ग्रामपंचायतीच्या उतारावर आणि गणपती विसर्जनाच्या नाल्याच्या ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूच्या जागेवर भगदाड पडले हाेते. या ठिकाणी गाडीचा टायर जाऊन गंभीर अपघात हाेण्याची शक्यता हाेती. म्हणून यासंदर्भात लाेकनिर्माणने बातमीद्वारे लक्ष वेधून सदरचे बांधकाम सुरू करण्याची मागणी केली हाेती. या बातमीची दखल घेत  बांधकाम विभागामार्फत उद्या ९ जून राेजी बांधकाम सुरू केले जाणार आहे.