देवरूख प्रतिनिधी
कोकणातील सह्याद्री पर्वतरांगात असलेली घनदाट किर्र झाडी,अमावस्येची काळोखी रात्र,रातकिड्यांचे संगीत व सोबतीला हजारोंच्या संख्येने लखलख प्रकाशाने चमकणारे काजवे पर्यटकांना पहाण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
शनिवार दिनांक १७ जून रोजी सायंकाळी ६ वाजता देवरुख येथील हाॅटेल पार्वती पॅलेस जवळ जमायचे आहे. आपआपले वाहन आणायचे आहे. देवरुख पासुन ५० मिनिटांच्या अंतरावर काजव्यांचे ठिकाण आहे. पिण्याचे पाणी व रात्रीचे जेवण सोबत आणायचे आहे. पायात बूट ,हातात बॅटरी,काठी असणे आवश्यक आहे. संध्याकाळी ७ ते रात्री १० अशी वेळ आहे. ११ वाजेपर्यंत देवरुखला परत असा प्रवास आहे.
याठिकाणी गवा रेडा,जंगली श्वापदे दिसू शकतात. याच ठिकाणी ४० फूट घेराचे व १०० फूट उंच वृक्ष पहायला मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मोहिमा अमावस्येलाच आखल्या व यशस्वी केल्या. ही काजवे पर्यटनाची मोहीम यासाठीच अमावस्येला आखलेली आहे. यासाठी कोणतेही शुल्क नाही.
अधिक माहीतीसाठी आयोजक युयुत्सु आर्ते यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करणेत आले आहे.