मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर रस्ते झाले खड्डेमय

 

पनवेल/लोकनिर्माण (सुनील भुजबळ)



कोकणची लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर या ८४ किमीच्या रस्त्यावर पावसाळ्यात जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत.खड्ड्यांमुळे या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. वडखळपासून नागोठणे ते कोलाड या दरम्यान काही ठिकाणी मोठमोठ्या खड्ड्यांमुळे तर रस्त्याला तलावाचे स्वरूप आले आहे.