राजापूर लोकनिर्माण/सुनील जठार
जिल्हा नियोजनची पहिला बैठक पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या अध्यक्षते खाली अल्पबचत सभागृह,जिल्हाधिकारी कार्यालय,रत्नागिरी येथे पार पडली.
सदर बैठकीमध्ये आमदार डॉ.राजन साळवी यांनी अत्यावश्यक व विकासाच्या दृष्टीने मतदार संघातील प्रमुख मुद्दे उपस्थित करत पालकमंत्री नाम.उदय सामंत यांच्या समोर मांडले. त्यामध्ये लांजा तालुक्यातील उंचीवर दुर्गम भागात असलेल्या माचळ व राजापूर तालुक्यातील दोनिवडे येथे विशेष बाब मधून नवीन आरोग्य उपकेंद्र होणेबाबत मागणी केली, तसेच राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीतील गाळ उपसणे साठी निधी उपलब्ध होणे, संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथील रेस्ट हाऊस ची दुरवस्था झालेली असून ते नवीन करण्यात यावे, राणी लक्ष्मीबाई स्मारक विकसित करणेसाठी निधी उपलब्ध होणे, शासकीय रुग्णालय येथील विश्रामगृह/ धर्मशाळा इमारत मधील फर्निचर आणि विद्युतीकरण,पहिला व दुसरा मजला लिफ्टच्या प्रस्तावाला मंजुरी मिळणे, राजापूर तालुक्यातील ओणी विमलेश्वर मंदिराचा क वर्ग यात्रास्थळ यादी मध्ये समाविष्ट होणे, विद्युत पोल,ट्रान्सफोर्मर साठी महावितरणकडून निधी उपलब्ध होणे, ग्रामीण भागातील बंद झालेल्या बसेसेवा पूर्ववत सुरु करणे तसेच राजापूर तालुक्यातील आदी पाचल व केळवली तलाठी कार्यालय इमारत दुरुस्ती साठी निधी उपलब्ध होणे आदी मुद्दे उपस्थित करत नियोजन विकास समितीच्या बैठकीमध्ये पालकमंत्री नाम.उदय सामंत यांचे याविषयाकडे लक्ष वेधले.
तसेच आमदार डॉ.राजन साळवी यांनी लांजा व राजापूर येथे मिनी एम.आय.डी.सी. होण्याची मागणी करत जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सुविधा सुरू करणेबाबत विशेष मागणी पालकमंत्री नाम.उदय सामंत यांचे कडे केली.