कल्याण लोकनिर्माण टीम
ठाकुर्ली ते कल्याण दरम्यान अंबरनाथ लोकल पावसामुळे थांबली होती. या लोकमधून उतरून एक महिला व एक व्यक्ति सहा महिन्याच्या बाळाला घेऊन रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या नाल्यावरील अरुंद रस्त्यावरून चालले होते. त्या व्यक्तिच्या हातात असलेले बाळ निसटून नाल्यात पडले. नाल्यातील पाण्याचा प्रवाह खूप जोराचा असल्याने ते बाळ वाहून गेले.
बाळाचा शोध घेण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रयत्न सुरू केले. रात्री त्या ठिकाणी एनडीआरएफची टीम पोचली होती. मात्र अंधार असल्याने शोध कार्य पूर्ण होऊ शकले नाही. पाण्यात पडलेले बाळ अद्याप सापडू शकले नाही.
यासंबंधात संदर्भात माहिती घेतली असता बाळ सापडल्याची चुकीची माहिती माध्यमांमध्ये प्रसारित होत आहे. ठाणे जिल्हा प्रशासनास मिळालेल्या माहितीनुसार अद्याप वाहून गेलेल्या बाळाचा तपास लागलेला नाही.