कल्याण लोकनिर्माण/ सौ. राजश्री फुलपगार
समाजातील अनेक जळजळीत वास्तवाचे दर्शन त्यांनी कवितेच्या माध्यमातून लोकांपर्यंत शब्दबद्ध केले आहे अन्यायाच्या जळजळीत धगीला विझवण्याचे काम प्रेम उठाव नक्की करेल!
कवी नवनाथ रणखांबे लिखित 'प्रेम उठाव ' वाचनीय काव्य संग्रह नुकताच वाचनात आला. समाजातील अनेक जळजळीत वास्तवाचे दर्शन त्यांनी कवितेच्या माध्यमातून लोकांपर्यंत शब्दबद्ध केले आहे. काव्यसंग्रहाच्या नावातच कवीने समाजातील प्रेमासाठी दुरावलेल्या समाजाला आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न केला आहे.
अनेक समस्यांनी गांजलेल्या समाजाला माया , ममता आणि प्रेम मिळावे यासाठी कवीने "प्रेम उठाव" केला आहे. पुस्तकाच्या पृष्ठभागावरील चित्राने मन हेलावून जात. शांततेच प्रतिक देणारे शांतू दूताचे प्रतिक असणारे कबुतर सोबत डॉ. बाबासाहेबांच्या विचारधारेने प्रेरित होवून वज्रमुठी सोबत लेखनी यांचा सुंदर मेळ प्रेम उठावात तयार केला आहे.
कवी नवनाथ रणखांबे एका समान्य परिवरातून उंच महालात राहणाऱ्यांच्या समस्या इतक्याच झोपडीतल्या समस्यांना दादा देताना विचरांची शृखंला समानतेच्या पटीवर सुंदरतेने कवितेत मांडताना दिसतात .
सामाजिक दुभंगलेल्या मनांना, विचारांना विषमतेने दरी निर्माण करणाऱ्या मानसिकतेला "प्रेम उठाव " च्या माध्यमातून कवीने समानता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
अबोल्याचा उठाव
सांग कुठ पर्यत ?
हृदयाची धडकन
बंद पडे पर्यत ! ( उठाव पान 52)
कवी "उठाव " कवितेच्या चार ओळीत आयुष्याचा संघर्ष हृदयाची धडकन पूर्ण बंद होईपर्यंत करण्याचे धाडस करीत आहे. या विचारांना खरच सलाम!
उदास विचार करतांनाही समाजाचा विचार मनात निर्माण करणाऱ्या कवीने आपले आयुष्य जगताना हाल अपेष्ठांच्या ओझ्याला बाजूला ठेवून विचरांची शदोरी प्रेमाने वाटण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे. *शाहू फुले आंबेडकर विचारांच्या दृष्टीने वादळात गोल फिरणाऱ्या कवीने समता आणि विषमता " यांना "प्रेम उठाव" च्या माध्यमातून एकत्र झोळीत बांधण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे*.
साखळ दंडातील विचारांचा सागर मांडताना *मणिपूर सारख्या लजास्पद* प्रसंगाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. म्हणून कवीची विचारसरणी श्रेणी समाजाच्या चौकडी सोबत आत्मियतेने पाहताना वाटते, दुसऱ्याच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाने आसवांचा डोहात कवीच बुडवू शकतो. आशा विचारांना सलाम !
कवी नवनाथ रणखांबे यांच्या काव्य संग्रहातील सर्व कविता समाजातील सर्व स्तरातील सर्व विचरांची शिदोरी असून अन्यायाच्या जळजळीत धगीला विझवण्याचे काम प्रेम उठाव नक्की करेल!
पुस्तक :- प्रेम उठाव
किंमत :- 90₹
प्रकाश :- शारदा प्रकाश ठाणे
कवी :- नवनाथ रणखांबे
पुस्तक परीक्षण लेखक :- *एम . डी. कांबळे* (शिक्षक)
*शासकीय आश्रम शाळा पिवळी*, *वासिंद / ठाणे*
संपर्क :- 7798475505