खेर्डी औद्योगिक वसाहतीत अग्निशमन केंद्र सुरू करावे - युवासेना तालुकाप्रमुख उमेश खताते यांची उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे मांडणी


चिपळूण लोकनिर्माण प्रतिनिधी 

 खेर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये अग्निशमन केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी युवासेना तालुकाप्रमुख उमेश खताते यांनी उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी आमदार राजन साळवी उपस्थित होते.

यानुसार खेड हे चिपळूण तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील एक मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते, खेर्डी गावची लोकसंख्या सुमारे २५ हजार  आहे. खेर्डी हे उपशहर म्हणून ओळखले जाते. तसेच खेर्डीमध्ये औद्योगिक वसाहत आहे. परंतु येथील अग्निशम केंद्र बंद पडलेले आहे. गाव मोठ असल्याने अनेक प्रसंग घडत असतात. तसेच एम.आय.डी.सीमधील कंपन्यामध्ये देखील अनेक वेळा आग लागते. अशा वेळा जवळ अग्निशमन केंद्र नसल्यामुळे तसेच दुसरीकडून अग्निशमन येईपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

खेर्डी गाव शहराकडे वाटचाल करत आहे तरी भविष्यात वाईट प्रसंग घडू नये. तसेच घडल्यास खेर्डी एम.आय.डी.सी. मध्येच पर्याय उपलब्ध असावा या हेतूने खेर्डी एम. आय. डी. सी. मध्ये अग्निशमन केंद्र असणे गरजेचे प्रस्ताव सादर आहे. तरी आपण तत्कालीन उद्योग मंत्री तसेच मुख्य कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी पत्रद्वारे मागणी केली होती. याचे उत्तर ७ एप्रिल २०२१ रोजी मुख्य अग्निशमन अधिकारी, • अग्निशमन विभाग यांनी आपल्याला खेर्डीमध्ये अग्निशमन केंद्र मंजूर झाल्याचे पत्र दिले होते. परंतू पुढे काहीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. तरी  "लवकरात लवकर खेर्डी एम.आय.डी.सी. मध्ये बंद पडलेले अग्निशमन केंद्र पुन्हा सुरू करावे, अशी मागणी उमेश खताते यांनी केली आहे.

Popular posts
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
Image
देवरुखात जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तिक होणार साजरा! आणि लोकनिर्माण चे डिजिटल माध्यमात होणार पदार्पण
Image
पहलगम घटनेच्या निषेधार्थ यवतमध्ये सर्व धर्मीय कँडल मार्च काढून तीव्र निषेध
Image
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image