उद्योजक वसंत उदेग कोकण आयडॉल पुरस्काराने सन्मानित, मुंबई मध्ये संपन्न झाला दिमाखदार सोहळा, सर्वसामान्य लोकांची सेवा करणे ,शेती पूरक व्यवसायाला प्राधान्य देणे हाच माझा पक्ष : वसंत उदेग


चिपळूण लोकनिर्माण प्रतिनिधी 

सर्वसामान्य लोकांची सेवा करणे , शेतीपूरक व्यवसायाला प्राधान्य देणे हाच माझा राजकीय पक्ष असल्याचे सांगून आमच्या कळवंडे गावच्या लोकांना गावातच रोजगार उपलब्ध करून द्यावा ही संकल्पना मी आधीच निवडली आहे आमच्या गावात चाकरमानी फार कमी आहेत. गावातील स्थानिक मंडळी शेती व्यवसायावर चांगल्या प्रकारे उदरनिर्वाह करीत आहेत. या गोष्टीचा मला अभिमान आहे असे कोकण आयडॉल पुरस्काराचे मानकरी उद्योजक श्री. वसंत उदेग यांनी हा पुरस्कार स्वीकारताना आपल्या भाषणात बोलताना सांगितले.



     कोकणातील प्रतिष्ठित उद्योगपती तथा चिपळूण तालुक्यातील प्रतिथयश शेतकरी श्री.वसंत उदेग यांना ग्लोबल कोकण आणि कोकण क्लब यांच्या वतीने दिला जाणारा कोकणात अत्यंत

प्रतिष्ठेचा समजला जाणारा कोकण आयडॉल पुरस्कार रविवार दि.१६ जुलै रोजी छत्रपती शिवरायांच्या परिवारातले तंजावर तामिळनाडूचे राजे श्रीमंत बाबाजी राजे यांच्या हस्ते यांच्या हस्ते देऊन विशेष सन्मानित करण्यात आले. दादर मुंबई येथील

प्राचार्य बी.एन वैद्य सभागृह राजा शिवराय विद्यालय येथे हा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. या वेळी पुरस्कार स्वीकारताना श्री. वसंत उदेग बोलत होते. सामाजिक क्षेत्रात यशस्वीपणे वाटचाल करीत असताना श्री. वसंत उदेग यांनी राजकारणात येऊन कार्य करावे असे कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांकडून मार्गदर्शन आले यावर बोलताना उदेग यांनी आपल्या भाषणात सांगितले की मला राजकारणाची फार आवड नाही पण कोणत्याही पक्षात सक्रिय न राहता जी लोकांची सेवा करू शकतो त्यातच मला खरा आनंद आहे.

पुरस्कार वितरण सोहळ्याला कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव ,माजी ,मुख्य सचिव महाराष्ट्र शासन द.म सुखटनकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे नौदल प्रमुख  भागोजी आंग्रे यांचे वंशज श्री. रघुराजे आंग्रे . लोकमान्य टिळक यांचे वंशज श्री.कुणाल टिळक,दापोलीचे माजी आमदार चंद्रकांत मोकल सौ .वर्षा वसंत उदेग, मनीषा कराडे, ऋतुजा कराडे आदी मान्यवर या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित होते. संपूर्ण कोकणातून उत्कृष्ट सामाजिक कार्य करणाऱ्या दानशूर व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती यामध्ये श्री. वसंत उदेग होते यांचे नाव अग्रगण्याने घेण्यात आले यापूर्वी उद्योग व्यवसायामधील आणि सामाजिक क्षेत्रातील श्री. उदेग यांना असंख्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत .त्यांच्या श्री दत्त एजन्सी आणि उद्योग समूह या मार्फत बिल्डिंग मटेरियल मधील विक्री होणाऱ्या विविध उत्पादनांच्या मुख्य कंपनीच्या  वतीने सुद्धा सर्वोत्कृष्ट विक्री बद्दल पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. मागील वर्षी नुकतेच काही महिन्यापूर्वी दापोली येथे ते कृष्णा मामा महाजन स्मृती प्रतिष्ठान यांच्यावतीने कृष्णा मामा महाजन स्मृती हा पुरस्कार त्यांना देऊन गौरविण्यात आले होते. पुरस्कार स्वीकारल्यानंतर श्री .उदेग यांचे चिपळूणमध्ये आगमन होताच त्यांच्या श्री दत्त एजन्सी उद्योग समूहातील सर्व कर्मचारी आणि चिपळूण मधील मान्यवर मंडळी यांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले त्यांच्यावरती पुष्पवृष्टी करून जोरदारपणे स्वागत करण्यात आले. तर मंगळवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष जयद्रथ खरेदी ,सतीश खेडेकर,विक्री संघ चेअरमन दिलीप माटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष निलेश कदम ,माजी नगरसेवक शिरीष काटकर ,संजय मोहिते आदी मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. वसंत उदेग यांचे अभिनंदन केले.


Popular posts
शिरंबे ता.कोरेगाव हायस्कूलचा १००% निकाल
Image
अलोरे शिरगांव पोलीसांनी पाठलाग करून पकडले “दरोडेखोर”
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर रस्ते झाले खड्डेमय
Image
रायगड परिसरातील मोरबे डॅमच्या इर्शाळवाडीवर काल रात्री उशिरा दरड कोसळल्याची घटना,दरडीखाली ३० ते ४० घरं दबल्याचा अंदाज, चार जणांचा मृत्यू तर १०० जण बेपत्ता