चिपळूण लोकनिर्माण प्रतिनिधी
शहरातील डायमंड कॉम्प्लेक्स येथील मूळचे बिदाल सातारा येथील असणारे सध्या चिपळूण येथील कपड्यांचे व्यापारी उध्दवशेठ पिसे यांच्या पत्नी सौ प्रेमलाराणी पिसे यांचे वयाच्या ४५ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने नुकतेच निधन झाले.त्यांचा शहरातील महिला मंडळ यांच्या मध्ये सक्रिय सहभाग असायचा.त्यामाध्यमातून सामाजिक व धार्मिक कार्यात देखील त्या अग्रेसर असायच्या.
त्यांच्या अंत्ययात्रेप्रसंगी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच सातारा येथील अनेक नागरिक उपस्थित होते. त्यांचा दशक्रिया विधी आज ३० जुलै रोजी तर उत्तरकार्य १ ऑगस्ट रोजी डायमंड कॉम्प्लेक्स याठिकाणी होणार आहे.त्यांच्या पश्चात पती,मुलगा आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.