वरळी/ लोक निर्माण ( प्रसाद शेट्ये)
वरळी जी एम भोसले मार्गावरील सार्वजनिक दोन बस स्टाॅप हटवण्याची गरज नसतानाही वरळी पोलिस ठाणे व तसेच तेथील रहेजा बिल्डर्स यांच्या बळावर जबरदस्तीने बेस्ट अधिकारी यांनी दुसऱ्या ठिकाणावर स्थलांतरीत करण्यात आले असल्यामुळे तेथील नागरिकांना विनाकारण त्रास भोगावा लागत आहे.
वरळी जी•एम•भोसले मार्ग येथील बेस्टचे १) पोल क्रंमाक:-GMB/66 २) पोल क्रंमाक:-GMB/64 या ठिकाणावर किती सालापासुन दोन्ही कॉ पी के कुरणे बस स्टाॅप आधी पासुन त्या ठिकाणावर होते. परंतु बस स्टाॅप च्या पाठीमागे रहेजा बिल्डरचे टॉवरचे कामचालु असल्यामुळे आताच्या परिस्थितीत त्या ठिकाणावरून बस स्टाॅप हलविण्याची गरज नसतानाही जबरदस्तीने त्या ठिकाणा वरून बस स्टाॅप हलवुन ते दोन्ही बस स्टाॅप वरळी बीडीडी चाळ क्रंमाक :- ३८ व ३९ जी•एम•भोसले मार्ग या ठिकाणाच्या परिसरात लावण्याचा निर्णय घेऊन बेस्ट अधिकारी यांच्याकडुन जेव्हा बस स्टाॅप लावण्यात आले तेव्हा तेथील स्थानिक कार्यकर्ते सचिन गायकवाड (मनसे) व तेथील स्थानिक लोकांनी एकत्र येऊन विरोध केला असतांनाही तेथील स्थानिक लोकांचे काहीही ऐकुन न घेता बेस्टच्या अधिकारी यांनी तेथील स्थानिक वरळी पोलीस ठाणे अधिकारी यांच्या बळाचा वापर करून त्या ठिकाणी बस स्टाॅप लावण्यात आले आहे. यामुळे तेथील स्थानिक प्रवाशी न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.