चिपळूण /लोकनिर्माण (स्वाती हडकर)
चिपळूण तालुक्यातील ओमळी येथील २४ वर्षीय निलिमा चव्हाणचा मृतदेह मंगळवारी डोक्यावरील केस व भुवया नष्ट केलेल्या अवस्थेत दाभोळ खाडीत आढळला होता. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या प्रकरणातील गूढ कायम असले तरी निलिमाचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठवला असून तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे समजते.
निलिमा चव्हाण खेड बसस्थानकात चिपळूणकडे जाणार्या एसटीत बसली होती. मात्र ती चिपळूणला पोहचली नाही. मग ती कोणत्या थांब्याला उतरली? या बाबत पोलीस तपास करत आहेत. वाहक-चालकांचाही जबाब घेण्यात येणार आहे. यातून महत्वाची माहिती मिळेल, असा विश्वास पोलिसांना आहे. तसेच निलिमाचा मोबाईल यानंतर बंद दाखवत होता. तो रात्री १२ वाजता अंजनी स्टेशनजवळ कसा काय सुरू झाला? हे तपासातून कॉल डिटेल्स देखील तपासण्यात येणार आहेत.