पदवीधर मतदार नाव नोंदणीसाठी शनिवार व रविवारी प्रांत, तहसीलदार कार्यालये सुरु ऑनलाईन व पोस्टाने देखील होणार नोंदणी : पदवीधर मतदारांना नाव नोंदणीचे आवाहन

 

रत्नागिरी लोकनिर्माण (सुनील जठार)

 मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या https://gterollregistration.mahait.org/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पदधतीने किंवा संबंधित तहसीलदार कार्यालय/ उपविभागीय अधिकारी कार्यालयात पोस्टाने देखील अर्ज दाखल करू शकतात. दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीसाठी नमुना 18 द्वारे दावे व हरकती दिनांक 6 नोव्हेंबर 2023 पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. तसेच उद्या शनिवार दिनांक 4 व रविवार दि. 5 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार कार्यालये सुरू राहणार आहेत. तरी पदवीधारकांनी पदवीधर मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करावी, असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड यांनी केले आहे.* 

    भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्याकडील दि. 9 ऑगस्ट 2003 च्या पत्रान्वये दि. 1 नोव्हेंबर 2023 या अर्हता दिनांकावर आधारित कोकण विभागातील पदवीधर मतदार संघासाठी मतदार यादीचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्याचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे.

पुनरिक्षण कार्यक्रमाचे टप्पे व कालावधी

नमुना 18 द्वारे दावे व हरकती स्वीकारण्याचा अंतिम दिनांक दि. 6 नोव्हेंबर 2023 (सोमवार) असा आहे.  हस्तलिखिते तयार करणे व प्रारूप मतदार याद्यांची छपाई दि. 20 नोव्हेंबर 2023 (सोमवार) असा आहे. प्रारूप मतदार याद्यांची प्रसिध्दी दि. 23 नोव्हेंबर 2023 (गुरुवार) असा आहे. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी दि. 23 नोव्हेंबर 2023 (गुरुवार ते दि. 9 डिसेंबर 2023) असा आहे. दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई दि. 25 डिसेंबर 2023 (सोमवार) असा आहे. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्याचा दिनांक दि. 30 डिसेंबर 2023 (शनिवार) असा आहे.

पदवीधर मतदार नोंदणी साठीची पात्रता -

दिनांक 1 नोव्हेंबर 2023 या अर्हता दिनांकाच्या कमीत कमी 3 वर्ष अगोदर पूर्ण झालेली पदवी/पदोत्तर किंवा पदवी

समकक्ष पदविका पात्रता म्हणजेच दि. 30 ऑक्टोबर 2020 रोजी व त्यापूर्वी पदवी किंवा पदवीत्तर शिक्षण अर्हता पूर्ण झालेली असावी. मतदार हा पदवीधर मतदार संघातील रहिवासी असावा. मतदाराचे पदवी / पदवीत्तर शिक्षण भारतातील कोणत्याही विद्यापिठातून पूर्ण झालेले असेल ते ग्राहय मानले जाईल. तीन वर्षाच्या कालावधी हा ज्या दिनांकास अहंता पदवी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असेल आणि ते विद्यापीठ किंवा अन्य संबंधित प्राधिकरण यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आला असेल त्या दिनांकापासून मोजण्यात येईल. अर्जासोबत रहिवास पुरावा तसेच राजपत्रित अधिकारी यांनी प्रमाणित केलेले पदवी/ पदक प्रमाणपत्राची प्रत आवश्यक आहे.

  पदवीधर मतदार संघाची मतदार यादी प्रत्येक निवडणुकीपूर्वी नव्याने तयार करण्याची (de-nova) असल्याने सर्व पात्र उमेदवारांनी नव्याने नमुना क्र. 18 भरणे आवश्यक आहे. मतदार यादी ही नव्याने तयार करण्याची असल्याने जुन्या यादीत जरी आपले नाव असले तरीही नव्याने अर्ज करणे आवश्यक आहे. सुधारीत नमुना क्र 18. हस्तलिखित टंकलिखित किंवा खासगीरित्या छापलेले अर्ज देखील स्वीकारले जातील.

     सर्व पात्र पदवीधर अधिकारी/कर्मचारी यांनी कोकण विभाग पदवीधर मतदार संघाचे मतदार यादीत नाव नोंदणीसाठी नमुना नं. 18 पुढील ठिकाणी सादर करता येईल. संबंधित तहसीलदार कार्यालय/उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयात किंवा मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या https://gterollregistration.mahait.org/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पदधतीने अर्ज करु शकतील किंवा संबंधित तहसीलदार कार्यालय/उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयात पोस्टाने देखील अर्ज दाखल करू शकतात.