लोटे औद्योगिक क्षेत्रात ऑफ - साईट सेफ्टी मॉकड्रील यशस्वी

 

खेड/लोकनिर्माण (प्रमोद आंब्रे)

 लोटे औद्योगिक क्षेत्रामध्ये अतिशय घातक रसायनांची हाताळणी बऱ्याच उद्योगांमध्ये केली जाते. या दृष्टीने या परिसरात एखादी दुर्दैवी घटना घडल्यास त्याची हाताळणी कशी करायची?याचे प्रात्यक्षिक सह-संचालक-औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय,कोल्हापूर यांच्या निर्देशानुसार, तसेच स्थानिक आपत्कालीन स्थिती हाताळणाऱ्या ग्रुपच्या (LCG Group)आणि घरडा केमिकल्स लिमिटेड च्या सहाय्याने दिनांक  ०१/१२/२०२३ रोजी लोटे एमआयडीसी क्षेत्रात ऑफ - साईट सेफ्टी मॉकड्रिल घेण्यात आले.      या सेफ्टी मॉकड्रिल करिता घातक रसायनांच्या वायुगळती संदर्भात रूपरेखा तयार करण्यात आली होती.घरडा केमिकल लिमिटेड लोटे च्या आपत्कालीन परिस्थिती हाताळणाऱ्या टीमने यशस्वीपणे ही वायू गळती नियंत्रणात आणली. यावेळी प्रत्यक्ष घटनास्थळी महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती व आजूबाजूच्या परिसरातील छोटी दुकाने व सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणाहून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते.तसेच लोटे औद्योगिक क्षेत्रातील फायर स्टेशनचे अधिकारी श्री.नलावडे त्यांच्या संपूर्ण टीम व फायर टेंडर सहित उपस्थित राहून सदर ड्रिल मध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला.      याप्रसंगी श्री. राजेंद्र कुमार राजमाने, पोलीस उपाधीक्षक चिपळूण., श्री. प्रदीप भिंताडे, सहसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचनालय कोल्हापूर, श्री.राज आंब्रे,अध्यक्ष-लोटे परशुराम औद्योगिक संघटना ,डॉक्टर श्री.यतीन जाधव,औद्योगिक वैद्यकीय अधिकारी,श्री.विक्रमसिंह पाटील, महामार्ग वाहतूक, लोटे पोलीस क्षेत्र दुरक्षेत्राचे स .पो. नि.श्री.चव्हाण, खेडचे नायब तहसीलदार श्री.गिरी व लोटे प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित होते.अतिशय सुयोग्य प्रकारे सदरचे सेफ्टी मॉकड्रील यशस्वीपणे राबविल्याबद्दल सर्व सरकारी अधिकाऱ्यांनी या ड्रीलची प्रशंसा केली.या सेफ्टी मॉकड्रील प्रसंगी लोटे औद्योगिक क्षेत्रातील एलसीजी ग्रुप च्या सर्व केमिकल कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. घरडा केमिकल लिमिटेड लोटे चे साईट हेड श्री.रामचंद्र कुलकर्णी तसेच सर्व तांत्रिक अधिकारी वर्ग यांनी देखील हे ड्रिल यशस्वीपणे राबविण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

Popular posts
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image
चिपळूण नगर परिषदे हद्दीतील विविध योजना अंतर्गत प्रास्तावित विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोक अर्पण समारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न
Image